Stock: या हॉटेल स्टॉकचा 6 महिन्यात 141% रिटर्न
अर्थविश्व

Stock: या हॉटेल स्टॉकचा 6 महिन्यात 141% रिटर्न

रॉयल ऑर्किड हॉटेल्सच्या (Royal Orchid Hotels Ltd.) स्टॉकमध्ये गेल्या 5 दिवसांत 21 टक्क्यांची मजबूत तेजी दिसून आली आहे. शुक्रवारी इंट्राडेमध्ये बीएसईवर  हा स्टॉक 5 टक्क्यांहून वाढून 307.70 रुपयांवर पोहोचला.एका महिन्यात 49% वाढरॉयल ऑर्किड हॉटेल्सच्या (Royal Orchid Hotels Ltd.) स्टॉकने एका महिन्यात सुमारे 49 टक्के, सहा महिन्यांत 141 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, स्टॉक 2022 मध्ये 245 टक्के आणि एका वर्षात 190 टक्के वाढला आहे. आणि विशेष म्हणजे दोन महिन्यांत त्याच्या गुंतवणूकदारांची रक्कम जवळजवळ दुप्पट झाली आहे. हा स्टॉक 18 जुलै 2022 रोजी 147.30 रुपयांच्या पातळीवर होता आणि 23 सप्टेंबर रोजी 303 रुपयांवर आहे.हेही वाचा: Share Market : या दोन स्टॉकमध्ये मिळेल बंपर रिटर्न, तुमच्याकडे आहेत का ?कंपनी काय करते ?रॉयल ऑर्किड हॉटेल्स ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी हॉटेल चेन आहे. यात फाइव्ह स्टार, फोर स्टार आणि रिसॉर्ट्सचा समावेश आहे. ही कंपनी बिझनेस आणि लीझर ट्रॅव्हलर्सना टारगेट करते. कंपनी सध्या भारतात 72 हॉटेल्स चालवते.Recommended ArticlesAxar Patel : मॅक्सवेल बाद! अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत2 minutes agoहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.4 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : कांगारूंचा निम्मा संघ माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म12 minutes agoMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज20 minutes agoहेही वाचा: Share Market : शेअर बाजाराच्या घसरणीदरम्यान ‘हा’ शेअर देईल चांगला परतावाजून तिमाही निकालजून 2022 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल 64 टक्क्यांनी वाढून 38.08 कोटी झाला आहे, जो मार्च 2022 ला संपलेल्या तिमाहीत 23.17 कोटी रुपये होता. त्याच वेळी, या काळात प्रॉफिट आफ्टर टॅक्स 2.78 कोटी रुपयांवरून 6.88 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून, कंपनीने ऍसेट लाइट मॉडेलमध्ये प्रवेश वाढवण्यावर भर दिला आहे. यामध्ये मालमत्ता भाड्याने घेणे आणि मालमत्तेच्या मालकांशी मॅनेजमेंट कॉट्रॅक्ट करण्याचा समावेश आहे.नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.