5 वर्षांत 2 कोटी रुपये, एसआयपीमध्ये अशी करा गुंतवणूक…
अर्थविश्व

5 वर्षांत 2 कोटी रुपये, एसआयपीमध्ये अशी करा गुंतवणूक…

मुंबई : म्युच्युअल फंड गुंतवणूकीत तुम्ही लाँग टर्ममध्ये मोठा फंड तयार करु शकता. म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी लाँग टर्ममध्ये 12 ते 15 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एकरकमी आणि सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (SIP) करता येते. जर तुम्हाला 15 वर्षात 2 कोटी रुपये जमवायचे असतील तर SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्हाला दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल  ते जाणून घेऊयात.- दर महिन्याला 40,000 रुपये गुंतवल्यास आणि ते 15 वर्ष ही गुंतवणूक अशीच ठेवल्यास तुम्ही सहजपणे 2,01,83,040 रुपयांचा कॉर्पस तयार करू शकता.- अंदाजे वार्षिक परतावा  12% आहे, जो यापेक्षाही जास्त असू शकतो.SIP कॅल्क्युलेटर: गुंतवणूक 72 लाख, नफा 1.29 कोटीतुम्ही 15 वर्षांसाठी SIP मध्ये महिन्याला 40,000 रुपये गुंतवले असतील, तर तुम्हाला सुमारे 1.29 कोटी रुपयांचा फायदा होतो. यात तुमची गुंतवणूक फक्त 72 लाख रुपये असेल. पण, 12% अंदाजे परतावा आहे, तो यापेक्षा जास्त असू शकतो किंवा कमीही असू शकतो. बाजारातील अस्थिरता म्युच्युअल फंड्सच्या कामगिरीवर परिणाम करू शकते.म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक लवकरात लवकर सुरू करावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण, यामुळे तुम्हाला लॉन्‍ग टर्मपर्यंत रिटर्न बेनेफिट मिळतो. समजा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी 40,000 रुपयांची SIP सुरू केली, तर वयाच्या 40 व्या वर्षी तुमच्याकडे 2 कोटी रुपये असतील.Recommended ArticlesBollywood: अजय देवगणला का झालेय दु:ख ?Bollywood चा सिंघम अजय देवगण हा त्याच्या दमदार अभिनयाने सर्वांच्याच मनावर अधिराज्य गाजवतोय.सध्या तो ‘थँक गॉड’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमूळे तो वादातही अडकला आहे. तो सध्या खूप दु:खी आहे. त्याच कारणही तसंच आहे.आज त्याचा पाळीव कुत्रा कोको गमावल्याबद्दल शोक व्यक्त केला. त्याने त्याच्या सो3 hours agoPune : बारामतीच्या कविवर्य मोरोपंत स्पर्धेत पराग बदिरके ठरला विजेताबारामती : यंदाच्या कविवर्य मोरोपंत वक्तृत्व स्पर्धेचे विजेतेपद¬¬ पराग राजेंद्र बदिरके (यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे) याने पटकावले. रोहन ज्योतीराम कवडे व तेजस दिनकर पाटील यांच्या संघाने (अप्पासाहेब जेधे महाविद्यालय, पुणे) हा वादविवाद स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. 3 hours agoHealth: सावध! सतत घामाचा वास येत असेल तर असू शकतो गंभीर आजार, कसं ओळखायचं?Health Tips: अति धावपळ झाल्यास किंवा गर्दीसारख्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीस घाम येणे साहाजिक आहे. मात्र अनेकदा अनेकांना त्यांच्या घामाचा वास येत असल्याचे जाणवते. असे तुमच्याही सोबत होत असल्यास तुम्हालाही लगेच सावध होण्याची गरज आहे. कारण तुमच्या घामाचा वास येत असल्यास तुम्हाला असू शकतात काह4 hours agoभीमाशंकर साखर कारखाना नवीन १६ मेगावॉट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प ; वळसे पाटीलपारगाव : भीमाशंकर साखर कारखाना नवीन १६ मेगावॉट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प उभारणार असून त्यासाठी ४१ कोटी रुपये खर्च करणार आहे तसेच १३७ कोटी रुपये खर्चाच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांन4 hours agoएसआयपी ही गुंतवणुकीची सिस्‍टमॅटिक पद्धत आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला थेट बाजाराच्या जोखमीला सामोरे जावे लागत नाही. त्याच वेळी, परतावाही जास्त आहे. पण, यामध्येही धोका आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराने त्याचे उत्पन्न, टारगेट आणि रिस्‍क प्रोफाइल पाहूनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.