Mahindra Alturas G4 : महिंद्राच्या SUV चा नवीन स्वस्त व्हेरिएंट लॉंच, वाचा डिटेल्स
इन्फोटेक

Mahindra Alturas G4 : महिंद्राच्या SUV चा नवीन स्वस्त व्हेरिएंट लॉंच, वाचा डिटेल्स

देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्राने त्यांच्या फ्लॅगशिप SUV Alturas G4 च्या व्हेरियंट लाइन-अपमध्ये एक नवीन व्हेरिएंट लॉन्च केला आहे. महिंद्राने Alturas G4 लाइन-अपमध्ये एक नवीन अधिक परवडणारी 2WD हाय व्हेरिएंट सादर केला आहे ज्यामध्ये 4WD मॉडेलची अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.नवीन 2022 Mahindra Alturas G4 2WD हाय व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 30.68 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. हे व्हेरिएंट 4WD मॉडेलच्या खाली पोजिशन करण्यात आले आहे, ज्याची सध्या किंमत 31.88 लाख रुपये आहे. या दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत. या किंमतीमुळे Alturas G4 भारतीय बाजारपेठेतील सर्वात परवडणारी पूर्ण-आकाराची SUV ठरली आहे.बदलांबद्दल बोलयाचे झाल्यास , नवीन Alturas G4 2WD हाय व्हेरियंटमध्ये सर्व फीचर्स मिळतात जी पूर्वी फक्त रेंज-टॉपिंग 4WD मॉडेलसह देण्यात आली होती. उदाहरणार्थ, SUV च्या 2WD हाय व्हेरियंटमध्ये आता रेन-सेन्सिंग वायपर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, मेमरी फंक्शनसह ड्रायव्हरच्या सीटसाठी इलेक्ट्रॉनिक ऍडजस्टमेंट आणि स्टँडर्ड पॉवर टेलगेट मिळते.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अक्षर पटेलचा भेदक मारा; मॅथ्यू वेड देखील माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म9 minutes ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग14 minutes agoVIDEO| Axar Patel : अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत16 minutes agoहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.18 minutes agoहेही वाचा: TVS ने लाँच केली नवीन ज्युपिटर क्लासिक स्कूटर, जाणून घ्या किंमत-फीचर्सफीचर्सMahindra Alturas G4 मध्ये Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह 8.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हेटिलेटेड सीट्स, इलेक्ट्रिक सनरूफ, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 6-स्पीकर साउंड सिस्टम यांसारखे फीचर्स देखील मिळतात.सेफ्टी फीचर्ससुरक्षेबद्दल बोलायचे झाले तर यात 9 एअरबॅग्ज, EBD सह ABS, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, ESP, हिल स्टार्ट असिस्ट, डिसेंट कंट्रोल आणि बरेच काही देण्यात आले आहे.हेही वाचा: फ्लिपकार्ट सेलमध्ये ‘या’ फोनची विक्री सर्वाधिक; किंमत 15 हजारांपेक्षा कमीइंजिनMahindra Alturas G4 च्या मकॅनिकल स्पेसिफिकेशन्समध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीयेत आणि ती तशीच आहेत. यात अजूनही BS-VI 2.2-लीटर टर्बो डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 181 bhp पॉवर आणि 420 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 7-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, जे मर्सिडीज-बेंझ कडून घेतले आहे आणि याला RWD ड्राइव्हट्रेन मिळते.भारतीय बाजारपेठेत, Mahindra Alturas G4 ही टोयोटा फॉर्च्युनर, एमजी ग्लोस्टर, इसुझू एमयू-एक्स, जीप मेरिडियन सारख्या कारशी स्पर्धा करते .