प्रत्येक गावात फोरजी-फाईव्हजी नेटवर्क
अर्थविश्व

प्रत्येक गावात फोरजी-फाईव्हजी नेटवर्क

मुंबई – देशाच्या प्रत्येक गावात फोरजी-फाईव्हजी नेटवर्क मिळावे यासाठी राज्य सरकार तीस अब्ज डॉलर गुंतवणार आहे, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज येथे ग्लोबल फिनटेक वेस्ट च्या समारोप प्रसंगी सांगितले. ग्रामीण भागात डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकार वेगाने प्रयत्न करीत आहे. गावागावात फोरजी-फाईव्हजी नेटवर्क उभारण्यासाठी सरकार तीस अब्ज डॉलर खर्च करणार आहे. सध्या सरकारने हे नेटवर्क दीड लाख गावांपर्यंत नेले आहे. गावागावातून उद्योजक निर्माण करणे, तरुणांच्या सकारात्मक ऊर्जेचा वापर करून घेणे तसेच गावांना देशाच्या विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी तेथे हाय स्पीड कनेक्टिव्हिटी उभारणे, यावर सरकार भर देत आहे. आता दरमहा ८० हजार गावांना नवी कनेक्शन दिली जात आहेत, असेही ते म्हणाले. डिजिटल इंडिया च्या निर्मितीसाठी दूरसंचार क्षेत्र हा पाया आहे आणि प्रगती साधण्यासाठी डिजिटल नियमक यंत्रणेची फेरचना करण्याचा पंतप्रधानांचा मानस आहे. ही यंत्रणा जागतिक दर्जाची असावी यावरही भर दिला जाईल. नवे टेलिकॉम विधेयक, डिजिटल पर्सनल डाटा संरक्षण विधेयक आणि आयटी अॅक्ट २००० यांच्या आधारे ही नियमक यंत्रणा उभारली जाईल. त्याआधारे उद्योग आणि सरकार या दोघांच्याही शंका दूर केल्या जातील, असेही ते म्हणाले.Recommended ArticlesAjit Pawar on Devendra Fadnavis : अजित पवारांनी फडणवीसांना का दिल्या शुभेच्छा?३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलाच टोमणा लगावला आहे.3 hours agoVastu Tips : घरामध्ये चुकूनही अशाप्रकारे ठेवू नका चपला-बूट, संकटांना तोंड द्यावे लागेल..घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी वास्तुशास्त्राचे काही नियम उपयुक्त आहेत. कोणत्याही वास्तूचे नियम हे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जांवर आधारित असतात. वास्तूमध्ये प्रत्येक वस्तूला निश्चित दिशा असते. वास्तूमध्ये बूट आणि चप्पल घरात ठेवण्याचेही वेगवेगळे नियम आहेत. या नियमांचे पालन न केल्यास घरात वाद 3 hours agoनेलपॉलिश लवकर निघून जात असेल तर काय कराल ?नेलपॉलिशमुळे हात सुंदर दिसत असले तरीही बऱ्याचदा नेलपॉलिश लवकर निघून जाते. ती टिकून राहण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतील. 3 hours agoPune Crime : खडकी बाजार येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; सहा गंभीर, ११ अटकेतपुणे : खडकी बाजार येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार दोन गटात पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडला. हे सर्व जण २० ते २५ वर्ष वयोगटातील आहेत. दरम्यान या घटनेनंतर परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.3 hours ago