प्रतीक्षा संपली! PM मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोबरला होणार 5G सेवेचा श्री गणेशा
इन्फोटेक

प्रतीक्षा संपली! PM मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोबरला होणार 5G सेवेचा श्री गणेशा

5G Network Launching : देशात 1 ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरू होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये 5G सेवेचा शुभारंभ करणार आहेत. केंद्राच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने ट्विट करून ही माहिती दिली आहे. प्रगती मैदानावर होणारी ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’ 4 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. हेही वाचा: Shivaji Park : ही तर शिंदेंची खेळी; BKC वर शिवतीर्थापेक्षा तोबा गर्दी जमवणार?केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, सरकारने अल्प कालावधीत देशात 5G दूरसंचार सेवांचे 80 टक्के कव्हरेज करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या टप्प्यात 5G सेवा देशभरातील सुमारे 13 शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. 5G वापरकर्त्यांना 4G पेक्षा 10 पट जास्त इंटरनेट स्पीड मिळेल असेही वैष्णव म्हणाले होते. तसेच, 5G सेवेद्वारे निर्माण होणाऱ्या रेडिएशनची पातळी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शिफारस केलेल्या पातळीपेक्षा खूपच कमी असल्याचेही स्पष्ट केले होते.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : कांगारूंचा निम्मा संघ माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म26 minutes agoMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज34 minutes agoNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु37 minutes agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स43 minutes agoहेही वाचा: कंन्फर्म! लवकरच येतोय Redmi चा सर्वात स्वस्त 5G फोन; ‘या’ तारखेला होईल लॉन्च पहिल्या टप्प्यात केवळ 13 निवडक शहरांना हायस्पीड 5G इंटरनेट सेवा मिळेल. या शहरांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे. हे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे वर नमूद केलेल्या या शहरांतील प्रत्येक नागरिकाला 5G सेवा मिळू शकत नाही. हे शक्य आहे की दूरसंचार कंपन्या या शहरांमधील निवडक भागात 5G सुविधा प्रदान करतील ज्याबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.