तुमच्यासाठी ती गोष्ट छोटी असेल, पण.. सिद्धार्थ जाधवची ही पोस्ट नेमकी कुणासाठी?
सिनेमा

तुमच्यासाठी ती गोष्ट छोटी असेल, पण.. सिद्धार्थ जाधवची ही पोस्ट नेमकी कुणासाठी?

siddharth jadhav : मराठी मनोरंजन विश्वातील सदैव आनंदी असणारा, हसणारा – हसवणारा आणि उर्जेने भरलेला असा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. आजवर नाटक आणि चित्रपटातून त्याने आपल्या भुरळ घातलीच शिवाय बॉलीवूडलाही वेड लावले. सिद्धार्थचे ‘तमाशा live’ आणि ‘दे धक्का 2’ हे चित्रपट नुकतेच येऊन गेले. त्यामुळे गेले काही दिवस सिद्धार्थ सातत्याने कॅमेऱ्यासमोर आणि चर्चेत आहे. सध्या तो स्टार प्रवाह वरील ‘आता हाऊदे धिंगाणा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. नुकतीच सिद्धार्थने एक पोस्ट लिहिली आहे. एका लेखकासाठी लिहिलेल्या या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (actor siddharth jadhav shared post for writer arvind jagtap ) चला हवा येऊ द्या कार्यक्रमात पोस्टमनचं पत्र लिहिणारे प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप. अरविंद यांनी चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून प्रेक्षाकांची मनं जिंकली. त्याचप्रमाणे अरविंद जगताप सध्या नाटक, वेब सिरिज, चित्रपट अशा तिहेरी माध्यमांत लेखन करत आहेत. त्यामुळे त्यांचाही चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. नुकतीच सिद्धार्थ आणि अरविंद जगताप यांची अचानक भेट झाली. या भेटी वेळी सिद्धार्थ अक्षरशः भारावून गेला. यावेळी जगताप यांनी सिद्धूला त्यांचे ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ हे पुस्तक भेट दिले. त्यांनंतर सिद्धार्थने एक पोस्ट लिहिली आहे. Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अक्षर पटेलचा भेदक मारा; मॅथ्यू वेड देखील माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 hours ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग1 hours agoVIDEO| Axar Patel : अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत1 hours agoहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.1 hours ago View this post on Instagram A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct) ”अरविंद जगताप .. लेखक म्हणून उत्तमच आहे.. हे सगळ्यांनाच माहीत आहे..पण माणूस म्हणून पण कमाल आहे… आज अचानक भेट झाली.. पण भेटीतला आपलेपणा मला खुप भावला… भावा ही तुझ्यासाठी “गोष्ट छोटी” असेल.. पण माझ्यासारख्या तुझ्या FAN साठी “डोंगराएवढी.. लव्ह यू भावा” अशी पोस्ट सिद्धार्थने लिहिले आहे. सिद्धार्थ साठी हा क्षण किती खास होता ते या पोस्ट वरुन समजते.