Vaibhav tatwawadi birthday: पूजा सावंतची पोस्ट बघाच, याला शुभेच्छा म्हणायच की?
सिनेमा

Vaibhav tatwawadi birthday: पूजा सावंतची पोस्ट बघाच, याला शुभेच्छा म्हणायच की?

Vaibhav tatwawadi birthday: ‘बाजीराव मस्तानी’, ‘कॉफी आणि बरच काही’, ‘पॉन्डीचेरी’ आणि अशा अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या अभिनेता वैभव तत्ववादीचा आज वाढदिवस. वैभव आज त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करतो आहे. मराठी त्याचप्रमाणे हिंदी सिनेमा, वेब सीरिज यामध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या वैभवचे लाखो चाहते आहेत. पण आज त्याच्या एका खास मैत्रिणीने त्याच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टची सध्या बरीच चर्चा आहे. वैभव आणि अभिनेत्री पूजा सावंत (pooja sawant) यांची मैत्री संपूर्ण मनोरंजन विश्वाला माहीत आहे. मध्यंतरी त्यांच्या अफेअरच्याही चर्चा होत्या. पण त्यांच्यातील मैत्री खूप घट्ट असल्याचे त्यांनी सांगितले होते. ते आज पूजाच्या पोस्ट वरुन अधिक स्पष्ट दिसते. आज वैभवच्या वाढदिवसानिमित्त तिने एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. Recommended Articlesमहिंद्राने पुन्हा परत मागवल्या XUV700 अन् Thar, जाणून घ्या कारणमहिंद्रा XUV700 आणि थार दोन्ही वाहनांच्या टर्बोचार्जरमध्ये समस्या आल्यानंतर या दोन्ही गाड्या कंपनीकडून परत मागवल्या जात आहेत. दरम्यान महिंद्राची XUV700 परत मागवण्याची ही पहिलीच वेळ नाही. या गाड्या रिकॉल केल्यामुळे ग्राहकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते.3 hours agoरात्रीच्या शिळ्या डाळीपासून हे पदार्थ करारात्रीची शिळी डाळ फेकण्यापेक्षा त्यापासून इतर पदार्थ तयार करता येतील. 3 hours agoरश्मिका मंदानाने वाढवले पुन्हा फॅन्सच्या हृदयाचे ठोके…दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाची फॅन फॉलोइंग खूपच मोठी आहे.3 hours agoKuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तरKuldeep Yadav Hat-Trick : भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव कधी भारतीय संघात दिसतो तर कधी नाही. जरी संघात असला तरी त्याला मालिकेतील सर्व सामन्यात खेळण्याची संधी मिळले याची शाश्वती नसते. मात्र भारतीय ‘अ’ संघाकडून खेळणाऱ्या कुलदीप यादवने निवडसमिती आणि संघ व्यवस्थापनाला आपल्याबाबत नव्याने व3 hours agoपूजाने वैभव सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. सोबत एक खास कॅप्शनही दिले आहे. ती म्हणते, ‘हॅप्पी बर्थ डे तत्ववादी.. तू असा मित्र आहेस की जो अत्यंत त्रासदायक आहे. पण केवळ तू त्रासदायक नाही तर मरेपर्यंत हसवणारा आहेस,’ असे तिने लिहिले आहे. तिच्या या पोस्टची सध्या बरीच चर्चा आहे. View this post on Instagram A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) पूजा ही मराठीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. पूजाने अनेक हीट सिनेमे दिले आहेत. नुकताच तिचा ‘दगडी चाळ 2’ चं चित्रपट येऊन गेला. तर वैभव सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘निर्मल पाठक की घर वापसी’ या त्याच्या सीरिजमुळे चर्चेत आहे.