Adventure bikes : तरुणांना वेड लावणाऱ्या ‘या’ अ‍ॅडव्हेंचर बाईक्स तुम्हाला माहिती का?
इन्फोटेक

Adventure bikes : तरुणांना वेड लावणाऱ्या ‘या’ अ‍ॅडव्हेंचर बाईक्स तुम्हाला माहिती का?

बाईक्स चालवणाऱ्या ग्राहकांची आवड लक्षात घेता बाईक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनीही एकाहून एक सरस अ‍ॅडव्हेंचर बाईक्स आता लाँच केल्या आहेत.सर्व सामान्य लोकांच्या बजेटचा विचार करून लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी या बाईक अतिशय उपयुक्त आहेत.बाईक रायडिंगचा छंद आजकालची तरुणपिढी जोपासत आहेत. मागील काही वर्षांत अ‍ॅडव्हेंचर ट्रिप्सकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्याही बरीच वाढलीय. लेह-लडाखसारख्या डोंगरदऱ्याच्या प्रदेशात जात बाईकस्वारीचा मुक्तछंद आनंद घेणं हे तरुणाईसाठी एकप्रकारे फॅशनच बनली आहे.तरुण मंडळीच्या पसंतीला उतरतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अ‍ॅडव्हेंचर बाईक्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. बहुतेक जणांना त्या महागड्या गाड्या घेणं परवडत नाही. पण कमी किमत असलेल्या आणि डोंगर-दऱ्यात सहज पार करतील यअशा बाईकही सहज उपलब्ध आहेत. चला तर अशाच रॉक्स अ‍ॅडव्हेंचर बाईक्स या लेखातुन सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात.Recommended ArticlesDelhi Crime : ‘दिल्लीत मुलंही असुरक्षित; १२ वर्षांच्या चिमुरड्यावर सामूहिक अत्याचार
नवी दिल्ली – दिल्ली देशाची राजधानी असली तरी गुन्हेगारीमध्ये देखील देशात सर्वात पुढे आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणाने देश ढवळून निघाला होता. दिल्लीत महिला सुरक्षित नसल्याचे आरोप नेहमीच करण्यात येते. त्यातच आता लहान मुलंही दिल्लीत सुरक्षित नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 3 hours agoDaughter’s Day: या कलाकारांच्या मुली गाजवतायत बॉलीवूड..Daughter’s day : असं म्हणतात की प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. पण तरीही त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवस निश्चित करण्यात आला आहे. ज आंतरराष्ट्रीय कन्या दिवस म्हणजेच मुलींचा दिवस. आजचे पालक सर्व रूढी तोडून आपल्या मुलींना पुढे नेत आहेत. बॉलिवूडमध्येही असे3 hours agoAjit Pawar on Devendra Fadnavis : अजित पवारांनी फडणवीसांना का दिल्या शुभेच्छा?३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलाच टोमणा लगावला आहे.3 hours agoवयोवृद्ध नागरिकांना लुटणाऱ्यांना अटकमुंबई, ता. २५ : वयोवृद्ध नागरिकांना धमकावून लुटणाऱ्या तीन आरोपींना मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. रमेश विजयकुमार जैस्वाल, नरेश विजयकुमार जैस्वाल, संजय दत्ताराम मांगडे अशी अटक आरोपींची नावे आहेत. ८ सप्टेंबर रोजी एक ६० वर्षीय पीडित वृद्ध मुलुंड परिसरातील नेहरू रोड येथून दुपारी रस्त्याने चालत3 hours agoहेही वाचा: Bike offer : १० हजार भरा आणि खरेदी करा ही जबरदस्त बाइक1.हिरो एक्सपल्स 200 (Hero XPulse 200): हिरो एक्सपल्स 200 ही परवडेल अशा किमतीतील अ‍ॅडव्हेंचर बाईक आहे. ही बाईक 199.6 cc एअर/ ऑइल कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन, 5 स्पीड ट्रान्समिशनसह येते. भारतात ही सर्वांत स्वस्त अ‍ॅडव्हेंचरबाईक असल्याचं मानलं जातं. 1.23 – 1.32 लाख रुपयांदरम्यान याची किंमत आहे. 2.होंडा सीबी 200x (Honda CB200X):ही बाईक 184.4 cc एअर कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन आणि 5 स्पीड ट्रान्समिशनसह बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. रस्ता असेल तिथंच नव्हे तर जिथे रस्ता नाही अशा ठिकाणीही बाईकवर प्रवास करणं सोपं आहे. या बाईकच्या किमतींची सुरुवात 1.46 लाख रुपयांपासून होते. हेही वाचा: Bike : फक्त २५ हजारांत मिळवा Hero bike3. येझदी अ‍ॅडव्हेंचर (Yezdi Adventure):साहसी बाईक्समध्ये येझदी अ‍ॅडव्हेंचर हा एक उत्तम पर्याय आहे. या बाईकमध्ये 334 cc चे लिक्विड-कूल्ड (Liquid Cooled), सिंगल-पॉट इंजिन आहे. ही बाईक 6 स्पीड ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. साहसी प्रवास आवडणाऱ्या (Adventure Lover) व्यक्ती या बाईकला पसंती देतात. 2.10-2.19 लाखांदरम्यान या बाईकची किंमत आहे. 4. सुझुकी व्ही-स्टॉर्म SX (Suzuki V-Strom SX):अ‍ॅडव्हेंचर ट्रिपसाठी सुझुकी व्ही-स्टॉर्म SX एक उत्तम पर्याय आहे. 249 cc चं ऑइल-कूल्ड इंजिन, सिंगल सिलिंडर, 6 स्पीड ट्रान्समिशनसह ही बाईक उपलब्ध आहे. या बाईकवर लांब पल्ल्याचा प्रवास करणं ही एक पर्वणी आहे. 2.12 लाखांपासून या बाईकची किंमत आहे. हेही वाचा: EV bike : १ रुपयात ५ किमी चालेल ही स्कूटर; फक्त १० हजारांत आणा घरी5. रॉयल एनफील्ड हिमालयन (Royal Enfield Himalayan): भारतात सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या बाईकमध्ये सर्वांत आधी रॉयल एनफिल्डचं नाव घेतलं जातं. या बाईकमध्ये 411 cc चं एअर-कूल्ड इंजिन, सिंगल सिलिंडर उपलब्ध आहे. ही बाईक 5 स्पीड ट्रान्समिशनसह येते. या बाईकचा रेट्रो लूक पाहताक्षणी ही बाईक डोंगर-दऱ्यांच्या प्रवासासाठीच बनली असल्याचं कळतं. 2.15-2.22 लाख रुपयांपासून बाईकच्या किमतीची सुरुवात होते.तर मग जर तुम्हीही हिमालयात फिरायला जायचा विचार करत असाल तर यापैकी एखादी बाईक घेऊन राईड करू शकता.