फ्लिपकार्ट सेलमध्ये ‘या’ फोनची विक्री सर्वाधिक; किंमत 15 हजारांपेक्षा कमी
इन्फोटेक

फ्लिपकार्ट सेलमध्ये ‘या’ फोनची विक्री सर्वाधिक; किंमत 15 हजारांपेक्षा कमी

चायनीज टेक कंपनी पोकोच्या स्मार्टफोन्सवरही फेस्टीव्हल सेलमध्ये मोठी सूट देण्यात आले आहे. कंपनीच्या डिव्हाइसेसना बजेट सेगमेंटमध्ये ग्राहकांकडून चांगली पसंती दिली जात आहे आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटशिवाय, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये त्याच्या डिव्हाइसेसची देखील जोरदार विक्री झाली. Poco M4 Pro आणि Poco C31 त्यांच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारे स्मार्टफोन बनले आहेत. पोको इंडियाचे प्रमुख हिमांशू टंडन यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करून नवीन रेकॉर्डशी संबंधित माहिती दिली आहे. त्याने सांगितले की Poco M4 Pro हा 15,000 रुपयांच्या अंतर्गत सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकला जाणारा AMOLED डिस्प्ले फोन बनला आहे. त्याच वेळी, Poco C31 हा 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकला जाणारा डिव्हाइस बनला आहे.Poco M4 Pro वर किती सूट मिळतेयPoco M4 Pro स्मार्टफोनची 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेलची लिस्टेड किंमत 17,999 रुपये आहे, पण तो सेलमध्ये 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्याच वेळी, अॅक्सिस बँक किंवा ICICI बँक कार्ड्ससह या फोनवर अतिरिक्त सवलत देखील उपलब्ध आहे. जर ग्राहकांनी त्यांचा जुना फोन एक्सचेंज केला तर त्यांना 10,400 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो.Recommended Articlesत्या वक्तव्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व चव्हाणांनी गमावले ?डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरुन कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. मंत्री चव्हाण यांच्या डोंबिवलीतील त्या वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज झाला आहे. डोंबिवलीतील शिंदे गटासह ठाकरे गटाने देखील चव्हाण यांच्यावर रस्ते कामावरुन टिकेची 2 hours agoKhambhatki Ghat: खंबाटकी घाटात दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगापुणे-बंगळुरू महामार्गावर रविवारी दुपारी खंबाटकी घाटात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवासी बऱ्याच वेळापासून वाहनात अडकून पडले आहेत. (khambhatki ghat news in Marathi)सविस्तर वृत्त थोड्याच वेळा…2 hours agoPune : कात्रज तलावात बूडून एकाचा मृत्यूकात्रज : नानासाहेब पेशवे तलावात एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी काही तरुण निघाले होते. त्यावेळी काहीजण बोटीने पुतळ्याच्या ठिकाणी पोहोचले. मात्र, ज्ञानेश्वर पांचाळ (वय2 hours agoJalgaon : रस्त्यावरील खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी मोठा वाघोदा (ता. रावेर) : महामार्गावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी गेल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) घडली. वाघोदा बुद्रुक येथील नारायण साहेबराव धामोडे (वय ३३) हा रात्री काम संपवून घरी जाण्यासाठी निघाला होता.(young man killed in accident due to potholes on road jalgaon latest news)2 hours agoहेही वाचा: boAt ची नवीन स्मार्टवॉच झाली लॉंच; किंमतही तुमच्या बजेटमध्येPoco M4 Pro चे फीचर्स6.4-इंचाचा AMOLED डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये MediaTek G96 प्रोसेसर दिला आहे. फोनच्या मागील पॅनलवर 64MP + 8MP + 2MP ट्रिपल कॅमेरा मिळतो आहे, तर फ्रंट पॅनलवर 16MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. डिव्हाइसमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.Poco C31 तर किती सूटबजेट सेगमेंटमध्ये, Poco C31 स्मार्टफोन 3GB + 32GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी केवळ 6,666 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. त्याच वेळी, फोनचा 4GB + 64GB व्हेरिएंट 7,777 रुपयांना लिस्टेड आहे. बँक कार्डसह या डिव्हाइसवर अतिरिक्त सवलत आणि एक्सचेंज डिस्काउंट देखील दिला जात आहे.हेही वाचा: Google Pixel वॉच खिशाला परवडेल का? किती असेल किंमत जाणून घ्या Poco C31 चे स्पेसिफिकेशन्सPoco चा हा बजेट फोन 6.53-इंचाच्या HD+ डिस्प्लेसह येतो आणि त्यात MediaTek Helio G35 प्रोसेसर दिला आहे. डिव्हाइसच्या मागील पॅनलवर 13MP + 2MP + 2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे आणि समोर 5MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. यात 5,000mAh क्षमतेची बॅटरी देखील आहे.