Airtel चा पैसा वसूल प्लान ! एका महिन्याच्या रिचार्जमध्ये ९० दिवस Free OTT सब्सक्रिप्शन, पाहा किंमत
इन्फोटेक

Airtel चा पैसा वसूल प्लान ! एका महिन्याच्या रिचार्जमध्ये ९० दिवस Free OTT सब्सक्रिप्शन, पाहा किंमत

नवी दिल्ली: Best Airtel Plans: दूरसंचार कंपनी भारती Airtel ने प्रीपेड ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन अनेक रिचार्ज प्लान उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये दररोज १ GB डेटा ते 3 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगच्या योजनांचाही समावेश आहे. एअरटेलच्या अनेक प्रीपेड रिचार्ज प्लान्समध्ये तुम्हाला अधिक डेटा आणि अमर्यादित कॉलिंग तसेच अनेक अतिरिक्त फायदे मिळतात. अशात जर तुम्ही अधिक डेटासह समान मोफत OTT सबस्क्रिप्शन ऑफर करणाऱ्या प्लानच्या शोधत असाल, तर हा Airtel प्लान तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. एअरटेलच्या या प्लानची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

एअरटेलच्या ३९९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्जमध्ये अनेक फायदे मिळतात . एअरटेलचा हा प्रीपेड रिचार्ज प्लान तुमच्यासाठी मोफत OTT सबस्क्रिप्शनसाठी चांगला पर्याय असू शकतो. यासह, तुम्हाला मोफत Hello Tunes चा अतिरिक्त लाभ देखील मिळतो. प्लानमध्ये, दररोज २.५ GB हाय स्पीड इंटरनेटसह सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळते. यासोबतच यामध्ये दररोज १०० मोफत एसएमएसही मिळतात. २८ दिवसांसाठी ७० GB इंटरनेट डेटाचा लाभ तुम्ही घेऊ शकता. पण, जेव्हा हाय स्पीड इंटरनेट मर्यादा संपते तेव्हा इंटरनेट स्पीड ६४ kbps होतो.

Airtel च्या ३९९ रुपयांच्या रिचार्जचे अतिरिक्त फायदे:

एअरटेलच्या ३९९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानसह, तुम्हाला Disney + Hotstar ची मोबाइल सदस्यता देखील मिळते. त्याची वैधता ९० दिवसांची आहे. म्हणजेच एका महिन्याच्या रिचार्जमध्ये तुम्ही ३ महिन्यांसाठी मोफत OTT सबस्क्रिप्शनचा आनंद घेऊ शकता. याशिवाय, तुम्हाला विंक म्युझिक आणि मोफत हॅलो ट्यून्सची मोफत सदस्यता मिळते. एवढेच नाही तर १०० रुपयांचा कॅशबॅक देखील FASTag वर प्लॅनसोबत उपलब्ध आहे.