गाडी चालवताना अपघात टाळण्यासाठी : अँटी स्लिप अलार्म
इन्फोटेक

गाडी चालवताना अपघात टाळण्यासाठी : अँटी स्लिप अलार्म

कार चालविताना सुरक्षितता महत्त्वाची ठरते. कार खरेदी करताना सुरक्षिततेसंबंधीचे फीचर्स पाहिले जात असतात. तसे, सध्याच्या आधुनिक कारमध्ये सुरक्षिततेशी संबंधित विविध फीचर्स दिलेली असतात. आजच्या कारमध्ये अनेक अत्याधुनिक सुरक्षा गॅझेट्स मिळतात. यामध्ये सहा एअरबॅगपासून ते सीट बेल्ट अलार्म आणि अनेक प्रकारचे सेन्सर यांचा समावेश आहे. काही गाड्यांना ADAS फीचर देखील मिळू लागले आहे. हे फीचर्स कार अपघाताचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. एवढ्या सुरक्षेनंतरही गाडी चालवताना मोठी अडचण दिसून येते. ती म्हणजे अचानक डोळा लागण्याची. अनेकवेळा गाडी चालवताना अचानक डोळ्यांवर झापड येते, झोप येते आणि अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता अधिक असते. अलीकडेच, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर सुरक्षेबाबतची चर्चा वाढली आहे. अशा परिस्थितीत, एक गॅझेट उपलब्ध आहे, की जे ड्रायव्हरला झोप येण्‍यापासून रोखते. म्हणजेच, झोप येत असताना ते ड्रायव्हरला सावध करते, अलर्ट करते. ‘अँटी स्लिप आलार्म’ (Anti Sleep Alarm) नावाचे हे गॅझेट ड्रायव्हरच्या कानावर लावलेले असते, की जे ड्रायव्हरला झोप आल्यास सावध करते.Recommended Articlesडोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च… समस्या गेल्या वर्षी प्रमाणेचडोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही…’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित क1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : अखेर भुवनेश्वरने दिला ग्रीनच्या तुफानी खेळीला रेड सिग्नलIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoPune Crime: मैत्रीणीसोबत गप्पा मारत बसलेल्या युवकांची निर्घृण हत्यापुणे – पुण्यातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाच्या डोक्यात दारूची बॉटल आणि झाडाची कुंडी घालून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. Pu1 hours agoNashik : लहान मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा ; पोलिसांचे आवाहनमालेगाव: राज्यात लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु आहेत. लहान मुले चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मिडीयावर झळकत आहेत. या अफवांमुळे शहरासह परिसरात भितीचे वातावरण आहे. पालक यामुळे चिंतेत असून, काही पालक मुलांना शाळेत पाठविण्यास1 hours agoहे गॅझेट कसे काम करते?हे गॅझेट अशा प्रकारे डिझाईन केले गेले आहे की, ते कानावर लावल्यानंतर ड्रायव्हरला झोप आल्याबरोबर सावध करते. यामध्ये स्विच ऑन आणि ऑफ बटण देण्यात आले आहेत. एका विशिष्ट कोनानंतर ड्रायव्हरचे डोके झुकताच हे गॅझेट अलार्म वाजवते. त्यामुळे चालक झोप येत असल्यास जागा होतो. याच प्रकारची विविध ब्रँडचे गॅझेट्स बाजारात आहेत, की जी गाडी चालवताना वापरता येतात. मात्र, ती वापरताना विशेषतः ऑनलाईन खरेदी करताना त्यांचे रिव्ह्यू पाहूनच ती खरेदी केलेली बरी. ‘अँटी स्लीप अलार्म’ हे गॅझेट ई-कॉमर्स साईट्सवर उपलब्ध असून त्याची किंमत ४९९ रुपये आहे.