एकीकडे राज्यात सत्तांतरातनंतर राजकीय वादळ उठलेलं असताना नागपूरमध्ये भाजपचे राज्यमंत्री आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात भेट झाली आहे. यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. नागपूर विमानतळावर या दोघांची भेट झाली आहे. याबाबत स्वतः भाजपच्या मंत्र्याने ट्वीट केले आहे. विमानतळावर झालेल्या भेटीदरम्यान, विविध गोष्टींवर चर्चा झाल्याचे बनगावचे भाजप खासदार आणि केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी म्हटले आहे. तसेच बंगालचा खेळ कशा पद्धतीने सुधारता येईल यावर चर्चा केल्याचे ते म्हणाले. मात्र, राजकारणाबाबत काय चर्चा झाली याबाबत ठाकूर यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. सौरव गांगुली अधिकृतपणे राजकारणाच्या आखाड्यात उतरणार की नाही याबाबत सातत्याने चर्चा केली जात आहे. त्यात भाजप नेते आणि गांगुली यांची भेट झाल्याने आता पुन्हा एकदा दादा राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. Recommended Articlesबापरे! पाच राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त तिरुपती बालाजी संस्थानाची संपत्तीTirumala Tirupati Devasthan Trust Property : तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD), या जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्टने अखेर त्यांच्या एकूण मालमत्ता किती याबद्दल माहिती उघड केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंदिराची संपत्ती ही मेघालय, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या एकत्रीत 1 hours agoDevendra Fadnavis: मी अख्खा महाराष्ट्र सांभाळला, मग ६ जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात? मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. मात्र पालकमंत्रीपदांच्या बाबतीत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपचीच सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडे तुलनेने अधिक जिल्ह्यांचा कार्यभार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे प2 hours agoवजन कसे वाढवाल ?वय आणि उंचीनुसार योग्य वजन नसल्यास काही घरगुती उपायांद्वारे वजन वाढवता येईल. 2 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : भारताचा गोलंदाजीचा निर्णय, भुवनेश्वर इन पंत आऊटIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 2 hours agoबंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती, मात्र सौरवने आपण सध्या राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, ज्या ज्या वेळी राजकारणातील एखाद्या नेत्याची आणि गांगुलीची भेट होते. त्यानंतर पुन्हा गांगुली राजकारणात येणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागतात. मग या भेटींमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असोत किंवा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबतची शिष्टाचार भेट असो. ममतांच्या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्याममता बॅनर्जी आणि गांगुलीचे संबंध खूप चांगले आहेत. 8 जुलै 2021 रोजी ममतांनी सौरवला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पिवळे गुलाब आणले होते. तसेच या दिवशी झालेल्या चर्चेदरम्यान ममतांकडून सौरवला राज्यसभेच्या खासदारपदाची ऑफर देण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली होती. मात्र सौरभने ती ऑफर नाकारली होती. तर त्या आधी काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह बेहाला येथील गांगुलीच्या घरी जेवायला गेले होते. त्यावेळीदेखील अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यावेळी गांगुलीच्या पत्नीने सौरव राजकारणात येणार की नाही हे मला माहीत नाही, पण राजकारणात गेल्यास चांगला खेळ करेल असे सूचक विधान केले होते.
Sourav Ganguly : नागपुरात भाजप नेता अन् गांगुलीची भेट, चर्चांना उधाण