Beauty Tips : ही अभिनेत्री चाळीशीतही दिसते ग्लॅमरस; काय आहे रहस्य?
लाइफस्टाइल

Beauty Tips : ही अभिनेत्री चाळीशीतही दिसते ग्लॅमरस; काय आहे रहस्य?

पुणे : ‘कसौटी जिंदगी की’ ही सिरीअल महिला वर्गात फेमस होती. आजही या सिरीअलचे रिपीट टेलिकास्ट पाहीले जातात. या सिरीअलमध्ये कोमोलिकाची भूमिका करणारी उर्वशी ढोलकिया सर्वांना माहीती असेल. उर्वशीने चाळीशी ओलांडली असली तरीही तिचा तजेलदार चेहरा आजही आकर्षक दिसतो. २० वय असलेल्या तरूणीसारखी ती ऍक्टीव्ह असते. योगा, डायट, यासारखे अनेक उपाय ती करते.चाळीशीनंतरही उर्वशी तरूण दिसते याचे सिक्रेट तिच्या किचनमध्ये दडलेले आहे. तुकतुकीत त्वचेसाठी ती काही घरगुती उपाय करते. याचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. पाहुयात उर्वशीचे ब्युटी सिक्रेट काय आहे.स्कीन सॉफ्ट आणि फ्रेश रहावी यासाठी स्कीन चांगल्या फेसवॉशने धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर बर्फाने मसाज करा. याने स्किनमधील पोर्स बंद होऊन त्वचा तजेलदार होते, असे उर्वशी म्हणते.Recommended Articlesरात्रीच्या शिळ्या डाळीपासून हे पदार्थ करारात्रीची शिळी डाळ फेकण्यापेक्षा त्यापासून इतर पदार्थ तयार करता येतील. 3 hours agoरश्मिका मंदानाने वाढवले पुन्हा फॅन्सच्या हृदयाचे ठोके…दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाची फॅन फॉलोइंग खूपच मोठी आहे.3 hours agoKuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तरKuldeep Yadav Hat-Trick : भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव कधी भारतीय संघात दिसतो तर कधी नाही. जरी संघात असला तरी त्याला मालिकेतील सर्व सामन्यात खेळण्याची संधी मिळले याची शाश्वती नसते. मात्र भारतीय ‘अ’ संघाकडून खेळणाऱ्या कुलदीप यादवने निवडसमिती आणि संघ व्यवस्थापनाला आपल्याबाबत नव्याने व3 hours agoत्या वक्तव्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व चव्हाणांनी गमावले ?डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरुन कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. मंत्री चव्हाण यांच्या डोंबिवलीतील त्या वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज झाला आहे. डोंबिवलीतील शिंदे गटासह ठाकरे गटाने देखील चव्हाण यांच्यावर रस्ते कामावरुन टिकेची 3 hours agoगुलाब जल आणि व्हिटॅमिन सीस्कीन चमकदार ठेवण्यासाठी उर्वशी गुलाबजल वापरण्याचा सल्ला देते. चेहऱ्यावर गुलाबपाणी शिंपडून 30 सेकंद तसेच ठेवा. यानंतर व्हिटॅमिन सी सिरम चेहऱ्यावर लावावे.घरगुती फेस पॅक वापराउर्वशी तिच्या त्वचेसाठी घरी बनवलेले बेसनाचे फेस पॅक वापरते. बेसन पॅक तयार करण्यासाठी एका भांड्यात दोन चमचे बेसन घाला. त्यात एक छोटा चमचा मध, दूध आणि लिंबू मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. नंतर पेस्ट सुकल्यावर साध्या पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *