क्रिप्टो करन्सी घसरले ; जाणून घ्या आजचा प्रमुख आभासी चलनांचा दर
अर्थविश्व

क्रिप्टो करन्सी घसरले ; जाणून घ्या आजचा प्रमुख आभासी चलनांचा दर

मुंबई : आज शनिवारी बिटकाॅइन, इथेरियम, बीएनबी, टेरा यासारख्या काॅइनच्या किंमतीत घसरण झाली. काॅइनमार्केटकॅपनुसार आज शनिवारी बिटकॉइनच्या किंमतीत ०.३४ टक्के घसरण झाली. एका बिटकाॅइनचा भाव ३८६०८.९६ डॉलर इतका झाला. मागील ७ दिवसांत त्यात २.६५ टक्के घसरण झाली.

क्रिप्टो करन्सी बाजारातील दुसरा लोकप्रिय कॉइन असलेल्या इथेरियमच्या किमतीत ०.८१ टक्के घसरण झाली. एक इथेरियमचा भाव २८३२.१९ डॉलर इतका झाला. मागील आठवडाभरात त्यात ४.३३ टक्के घसरण झाली होती. आज सोलाना कॉइनच्या किंमतीत घसरण झाली. एका सोलाना काॅइनचा भाव ९३.९८ डाॅलर झाला. आजच्या सत्रात टेरा कॉइनचा भाव ८४.१६ डॉलर इतका झाला असून त्यात १.४३ टक्के घसरण झाली.