Cyclone : जपानला चक्रीवादळाचा तडाखा
ताज्या बातम्या

Cyclone : जपानला चक्रीवादळाचा तडाखा

टोकिओ : नेऋत्य जपानमध्ये नान्माडोल चक्रीवादळामुळे रविवारी हजारो नागरिकांना घर सोडण्याची वेळ आली. दरम्यान, आज सकाळी एकाचा मृत्यू झाला तर आणखी एक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. जपानच्या वेधशाळेने कोगोशिमा भागातील लोकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. चक्रीवादळामुळे सुमारे पंचवीस हजाराहून अधिक घराचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. क्युशू विभागात काल चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाला आणि रस्ते जलमय झाले. तसेच शेकडो घरांचा वीज पुरवठा बंद झाला. ही मोटार शेतातील पाण्यात बुडाली होती. तसेच भूस्खलन होऊन एका घरावर दरड कोसळल्याने एक जण बेपत्ता झाला. नान्माडोल चक्रीवादळ ताशी १०८ किलोमीटर प्रतितास आणि १६२ किलोमीटर प्रतितासपर्यंत वाहू शकते, असे जपानच्या वेधशाळेने म्हटले आहे. चक्रीवादळामुळे संभाव्य नुकसान टाळावे यासाठी हजारो नागरिकांना स्थलांतरित केले आहे. पावसामुळे विविध घटनेत ६० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. कागोशिमा शहरात चक्रीवादळामुळे मोठी हानी झाली आहे. बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या क्रेन देखील पडल्या. खिडक्याची तावदाने देखील फुटल्याचे ठिकठिकाणी पाहवयास मिळाले. चक्रीवादळामुळे बुलेट ट्रेनसेवा स्थगित करण्यात आली आहे.जपानला दरवर्षी तडाखाजपानमध्ये दरवर्षी सुमारे २० चक्रीवादळ धडकतात. २०१९ मध्ये हगीबिस चक्रीवदाळाने धडक दिली होती. त्या वर्षी जपानमध्ये रग्बी विश्‍वचषकाचे आयोजन केले होते. य चक्रीवादळामुळे शंभराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये पूर आणि भूस्खलनात २०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. हवामान बदलामुळे चक्रीवादळाचा धोका वाढला आहे, असे हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.Recommended Articlesआजचे राशिभविष्य – 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.0 minutes agoKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी21 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 21 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म25 minutes ago