Video : लॉर्ड्सवर दीप्तीने असे काही केले की इंग्लंडचे खेळाडू ढसाढसा रडले
क्रीडा

Video : लॉर्ड्सवर दीप्तीने असे काही केले की इंग्लंडचे खेळाडू ढसाढसा रडले

India vs England : भारतीय महिला संघाने लॉर्ड्सवरील तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिकेत इंग्लिश संघाचा 3-0 असा धुव्वा उडवला. इतकेच नाही तर भारताने इंग्लंडला क्लीन स्वीप करून झूलन गोस्वामीला एक संस्मरणीय भेट दिली. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यादरम्यान इंग्लंडच्या शेवटच्या विकेट वरून मोठा गदारोळ झाला.ही संपूर्ण घटना दीप्ती शर्माने टाकलेल्या इंग्लिश डावाच्या 44 व्या षटकात घडली. त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी 16 धावा करायच्या होत्या. शार्लोट डीन शेवटची फलंदाज फ्रेया डेव्हिससह संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करत होती. नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभी असलेली शार्लोट डीन त्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीझमधून बाहेर पडली. दीप्तीने चाणाक्षपणा दाखवत चेंडू फेकण्याऐवजी स्टंप उडवला.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : पुन्हा स्लॉग ओव्हरचं दुखणं; टीम डेव्हिडकडून धुलाईIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म2 minutes agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.8 minutes agoSolapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.13 minutes ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग27 minutes agoभारतीय खेळाडूंनी धावबाद (मँकाडिंग) साठी अपील केले, त्यानंतर तिसऱ्या पंचाचा सहारा घेण्यात आला. रिप्लेने पुष्टी झाले की डीनने वेळेपूर्वीच क्रीज सोडली. तिसऱ्या पंचाने इंग्लिश फलंदाजाला धावबाद घोषित केले. धावबाद झाल्यानंतर भारतीय संघाने जल्लोष सुरू केला. दुसरीकडे इंग्लिश खेळाडूच्या डोळ्यात अश्रू आले.इंग्लंडचे चाहते आणि खेळाडू खूप निराश झाले असतील, तरी आयसीसीच्या नियमानुसार, मँकाडिंग आता सामान्य धावबाद मानला जाणार आहे. आयसीसीने यावर्षी मॅनकाडिंगला कायदा 41.16 (अयोग्य) वरून रन-आऊट नियम (38) मध्ये हलवले आहे. हा नवा नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.