Dinesh Karthik : 2 बाॅलमध्येच संपवली मॅच; परफेक्ट फिनिशर म्हणाला, मी कोणतंही श्रेय…
क्रीडा

Dinesh Karthik : 2 बाॅलमध्येच संपवली मॅच; परफेक्ट फिनिशर म्हणाला, मी कोणतंही श्रेय…

Dinesh Karthik : भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. रोहितने 20 चेंडूत नाबाद 46 धावांची नाबाद खेळी खेळली. दिनेश कार्तिकने 2 चेंडूत 10 धावा करून सामना जिंकून दिला. सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत कार्तिकला याबाबत विचारले असता तो म्हणाला, अहो सर मी कोणतेही श्रेय घेत नाही.हेही वाचा: Video : केवळ 2 बॉल खेळणारा कार्तिकचं मॅचविनर; पंत का आला नाही रोहितचा खुलासापत्रकार परिषदेत दिनेश कार्तिक म्हणाला, अहो मी कोणतेही श्रेय घेतले नाही सर, रोहित शर्माने अप्रतिम फलंदाजी केली. मला शेवटचे दोन चेंडू मिळाले. नवीन चेंडूने त्या विकेटवर तो शॉट खेळणे जागतिक दर्जाच्या गोलंदाजांना सोपे नसते. रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेटमध्येच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्ये किती मोठा खेळाडू आहे, हे यावरून दिसून येते. त्याच्याकडे वेगवान गोलंदाजांचा चेंडू खेळण्याची खूप चांगली क्षमता आहे ज्यामुळे तो खास बनतो.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अक्षर पटेलचा भेदक मारा; मॅथ्यू वेड देखील माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म11 minutes agoSolapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.12 minutes ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग26 minutes agoVIDEO| Axar Patel : अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत28 minutes agoहेही वाचा: Video : पहिल्या सामन्यात गळा धरला, आता गळ्यात पडला, रोहित म्हणजे ना…दिनेश कार्तिक पुढे म्हणाला, आज आम्हाला चार गोलंदाजांची गरज होती कारण एक गोलंदाज जास्तीत जास्त दोन षटके टाकू शकत होता. हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असताना टीममध्ये बराच समतोल असल्याचं दिसून येते. जागतिक क्रिकेटमध्ये संघाला असा समतोल साधणारे फार कमी खेळाडू आहेत. अक्षर पटेलही आता याच मार्गावर आहे. ऋषभ पंत आज खेळला, जरी त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.हेही वाचा: IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, मला अशी अपेक्षा नव्हती…पावसाने व्यत्यय आणलेल्या या 8 षटकांच्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने आठ षटकांत 5 गडी गमावून 90 धावा केल्या. मॅथ्यू वेडने सर्वाधिक 43 धावांची नाबाद खेळी खेळली. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक दोन बळी घेतले.प्रत्युत्तर भारतीय संघाने 4 चेंडू बाकी असताना 6 विकेट्स राखून सामना जिंकला. रोहित शर्माने 20 चेंडूत नाबाद 46 धावा केल्या. अखेरीस दिनेश कार्तिक 2 चेंडूत 10 धावा करून नाबाद राहिला.