चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ‘हे’ व्यायाम करा
लाइफस्टाइल

चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ‘हे’ व्यायाम करा

चष्मा लागण्याचा आणि वय वाढण्याचा आता काहीही संबंध राहिलेला नाही. अगदी पुर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागातील मुलांनाही चष्मा लागतोय. कमी वयात लागलेला चष्मा, डोळ्यांना आलेला थकवा आणि ताण. हा त्रास तसेच डोळ्यांचा नंबर कमी करण्यासाठी काही व्यायाम (Eye exercises) सांगितले आहेत.  डोळ्यांचे व्यायाम हे सगळे व्यायाम करण्यासाठी एका जागी शांत- ताठ बसावे आणि मन शांत करून एकाग्रतेने हे व्यायाम करावेत. पहिला व्यायाम म्हणजे चेहऱ्याच्या किंवा शरीराच्या इतर भागांची हालचाल न करता एकदा वर तर एकदा खाली बघावे. ही क्रिया 10 वेळा करावी.दुसऱ्या व्यायामामध्ये एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे बघावे. ही क्रिया देखील 10 वेळा करावी.तिसरा व्यायाम करण्यासाठी डोळ्यांची डायगोनल म्हणजेच तिरक्या दिशेत हालचाल करावी. म्हणजेच वर बघताना डाव्या बाजूने पाहिले तर खाली बघताना उजव्या बाजूने पहावे, तसेच वर जर उजव्या बाजूने बघितले तर खाली डाव्या बाजूने बघावे. या दोन्ही क्रिया प्रत्येकी 10-10 वेळा कराव्या.क्लॉकवाईज आणि ॲण्टी क्लॉकवाईज अशा दोन्ही दिशेने डोळे प्रत्येकी 10- 10 वेळा फिरवावेत.उजव्या हाताचा अंगठा अगदी नाकाच्या जवळ आणावा आणि हळूहळू हात शक्य होईल तितका लांब न्यावा.पुन्हा अंगठा हळूहळू नाकाजवळ आणावा. ही संपूर्ण क्रिया करताना अंगठ्यावर लक्ष केंद्रित करावे. ही क्रियाही 10 वेळा करावी.यानंतर दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून निर्माण होणारी उष्णता डोळ्यांना द्यावीशेवटचा व्यायाम म्हणजे 10 वेळा पटापट डोळ्यांची उघडझाप करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *