या ऑटो स्टॉकवर तज्ज्ञांना विश्वास, तुमच्याकडे आहे का ?
अर्थविश्व

या ऑटो स्टॉकवर तज्ज्ञांना विश्वास, तुमच्याकडे आहे का ?

मुंबई : ऑटो कंपनी टीव्हीएस मोटर्सबाबत (TVS Motor) देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस शेअरखान सकारात्मक आहे. शेअरखानने आपल्या रिसर्ट रिपोर्टमध्ये स्टॉकला बाय रेटिंग दिले आहे आणि त्यासाठी 1254 रुपयांचे टारगेट दिले आहे. कंपनीद्वारे ऍग्रेसिव प्रॉडक्ट लॉन्चिंग करणे, नवीन मार्केटमध्ये एन्ट्री कंपनीसाठी फायद्याची ठरेल असे शेअरखानचे म्हणणे आहे.ब्रँडिंगमधील नवीन लॉन्च आणि गुंतवणूकीमुळे कंपनीची भारतीय आणि ग्लोबल बाजारावर पकड आणखी मजबूत होईल. कंपनी येत्या 8-12 महिन्यांत इलेक्ट्रिक व्हेहिकल सेगमेंटमध्ये अधिक मजबूतीने उतरेल ज्याचा कंपनीला आणखी फायदा होईल.2022-24 या आर्थिक वर्षात कंपनीच्या कमाईत 48.5 टक्के वाढ होऊ शकते. कंपनीच्या कमाईत 19 टक्के वाढ आणि एबिटदा मार्जिन 220 बेसिस पॉइंट्स आहे. शेअरखानने या स्टॉकवर बाय रेटिंग मत कायम ठेवत 1254 रुपयांचे टारगेट दिले आहे.टीव्हीएस मोटर्सचा शेअर शुक्रवारी एनएसईवर 28.20 रुपये अर्थात 2.64 टक्क्यांनी घसरून 1,038.25 रुपयांवर व्यवहार करत होता. स्टॉकचा इंट्राडे 1,086.10 रुपयांवर आहे तर इंट्राडे लो 1,061.05 रुपयांवर आहे. कंपनीचे व्हॉल्यूम शेअर्स 93,678 आहेत.Recommended ArticlesAxar Patel : मॅक्सवेल बाद! अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत1 minutes agoहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.3 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : कांगारूंचा निम्मा संघ माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म11 minutes agoMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज19 minutes agoटीव्हीएस मोटर्सच्या स्टॉकने 21 सप्टेंबर 2022 ला 1,094.65 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता तर 7 मार्च 2022 ला 513 रुपयांवर आठवड्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. सध्या, हा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 2.18 टक्क्यांनी खाली व्यापार करत आहे तर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून 108.73 टक्क्यांवर ट्रेड करत आहे. कंपनीची मार्केट कॅप 50,872.33 कोटी रुपये आहे.नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.