व्याजदर अर्धा टक्का वाढण्याची शक्यता
अर्थविश्व

व्याजदर अर्धा टक्का वाढण्याची शक्यता

मुंबई : महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकी फेडरल रिझर्व्हसह स्विस बँक आणि ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकेने केलेल्या व्याजदरवाढीच्या उपायाप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकही आगामी पतधोरण बैठकीत व्याजदरात किमान अर्धा टक्का वाढ करण्याची दाट शक्यता बहुतांश अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रॉयटर्सने सर्वेक्षण केलेल्या ५१ पैकी २६ तज्ज्ञांनी रिझर्व्ह बँक अर्धा टक्का दरवाढीसह रेपो दर ५.९० टक्क्यांवर नेण्याची तर २० तज्ज्ञांनी व्याजदरात ०.३५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने घसरण होत असून २३ सप्टेंबर रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया ८१च्या पुढे गेला होता. तसेच देशात किरकोळ महागाईचा दरही सात टक्क्यांवर पोहोचला आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकही ३० सप्टेंबरच्या बैठकीत रेपो दरात अर्धा टक्क्याची वाढ करेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.Recommended ArticlesAxar Patel : मॅक्सवेल बाद! अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत2 minutes agoहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.4 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : कांगारूंचा निम्मा संघ माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म12 minutes agoMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज20 minutes ago