Google Tool : गुगलचं नवं टूल, आता काढू शकता सर्चमधून वैयक्तिक माहिती
इन्फोटेक

Google Tool : गुगलचं नवं टूल, आता काढू शकता सर्चमधून वैयक्तिक माहिती

वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर जगभरातून टीकेला सामोर जावं लागल्यानंतर, गुगलने सर्च मधून वैयक्तिक माहिती काढून टाकण्यासाठी एक नवीन टूल बनवल आहे. ‘रिझल्ट्स अबाऊट यू’ नावाच्या या टूलद्वारे वापरकर्ते मोबाइल नंबर, ईमेल आणि घराच्या पत्त्यासह वैयक्तिक माहिती (PII) काढून टाकण्यासाठी गुगलला थेट विनंती करू शकतील. मात्र, सुरुवातीला हे फिचर फक्त अँड्रॉइडवर गुगल ॲप वापरणाऱ्या लोकांसाठीच असेल. हेही वाचा: Navratri 2022 : तनिष्कचे हे ५ दागिने तुम्हाला बनवतील सुंदर आणि आकर्षक गुगलने आपल्या वार्षिक विकासक परिषदेदरम्यान या गोपनीयतेच्या टूलची घोषणा केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, वापरकर्ते त्यांच्या प्रोफाइल पेजद्वारे ‘रिझल्ट्स अबाऊट यू’ पर्यायावर जाऊ शकतात. तेथून ते गुगलला PII काढण्याची विनंती करणार्‍या दुसर्‍या पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जातील. या दरम्यान, प्रत्येक निकालाच्या वरच्या-उजव्या कोपऱ्यात दिसणार्‍या तीन बिंदूंवर क्लिक करून माहिती काढली जाऊ शकते.Recommended ArticlesWorld lung day 2022 : तुमचे फुप्फुस निरोगी आहे का ? घरबसल्या करा तपासणी…मुंबई : २५ सप्टेंबर रोजी जगभरात फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने जागतिक फुप्फुस दिन साजरा केला जातो. फुप्फुसाचा आजार हा एक वेदनादायक आजार आहे. कोणत्याही वयोगटातील लोक त्याला बळी पडू शकतात. आताही जगभरात दरवर्षी लाखो लोक फुफ्फुसाच्या आजारामुळे आपला जीव गमावतात. (Wor5 hours agoमोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये दोन कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा; AK-47 रायफल्स, दोन पिस्तूल जप्तश्रीनगर : जम्मू-काश्मीरमधून (Jammu and Kashmir) मोठी बातमी समोर येत आहे. सुरक्षा दलांना मोठं यश मिळालंय. भारतीय लष्कर (Indian Army) आणि स्थानिक पोलिसांनी नियंत्रण रेषेजवळ दोन कुख्यात दहशतवाद्यांना (Terrorists) कंठस्नान घातलं आहे. त्यांच्याकडून दोन AK-47 रायफल, दोन पिस्तूल आणि 4 ग्रेनेड जप्5 hours agogondiya: १२० मुला-मुलींचा एकाच ट्रकमधून प्रवासगोंदिया : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिवासी आश्रमशाळेतील 120 मुला-मुलींना एकाच ट्रकमध्ये कोंबून प्रवास करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शाळा प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे जवळपास दहा विद्यार्थी-विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली आहे. गाडीत श्वास घ्यायला जागा मिळत नसल्य5 hours agoअंगणवाडी सेविकांतर्फे पोषण आहाराबाबत जनजागृतीअंबरनाथ, ता. २५ (बातमीदार) : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी पोषण आहाराबाबत मातांमध्ये जनजागृती करत अभिनव पद्धतीने मंगळागौरचे आयोजन केले. यानिमित्त अंबरनाथच्या जुन्या भेंडी पाडा परिसरात बाल विकास प्रकल्पांतर्गत महत्त्वपूर्ण पोषण आहाराबाबत कार्यक्रम घेण्‍यात आला. लहान मुलांच्या आहाराबाबत5 hours agoसध्या, कोणताही PII काढण्यासाठी वापरकर्त्यांना वरील पद्धत वापरावी लागेल .’रिझल्ट्स अबाउट यू’ मध्ये ‘ऑल रिक्वेस्ट’, ‘इन प्रोग्रेस’ आणि ‘अप्रूव्ड सारखे विनंतीशी संबंधित फिल्टर्स देखील असतील. गुगलने यापूर्वी सांगितले होते की जेव्हा कंपनीला PII काढून टाकण्याची विनंती प्राप्त होईल, तेव्हा ती त्याची दखल घेईल . या वर्षाच्या सुरुवातीला, गुगलने वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती काढून टाकण्यासाठी त्यांची धोरणे अपडेट केली होती.