निराशाजनक भांडवली बाजारात या पेनी स्टॉककडून मात्र अप्पर सर्किटमध्ये पार
अर्थविश्व

निराशाजनक भांडवली बाजारात या पेनी स्टॉककडून मात्र अप्पर सर्किटमध्ये पार

मुंबई – अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने ७५ बेसिस पॉइंट व्याजदर वाढवण्याच्या घोषणेनंतर सर्व प्रमुख जागतिक निर्देशांक घसरले. कमकुवत जागतिक संकेतांमुळे शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय निर्देशांक १% पेक्षा अधिक घसरले. निफ्टी५० आणि सेन्सेक्स अनुक्रमे १७,५०० आणि ५९,००० पर्यंत घसरले.

बीएसई वित्तीय सेवा आणि बीएसई बँक हे दोन्ही क्षेत्रीय निर्देशांक जवळपास प्रत्येकी २% ने घसरले. बहुतेक क्षेत्रीय निर्देशांक कमी मूल्य स्तरावर व्यवहार करत होते. सर्वसाधारणपणे कमकुवत असलेल्या बाजारपेठेत बीएसई माहिती तंत्रज्ञान निर्देशांक मात्र सुरुवातीच्या काही सत्रात सर्वाधिक नफा नोंदविवणारे क्षेत्र होते. ३% पेक्षा अधिक वाढीसह न्युजेन सॅफ्टवेअर टेक्नॅलॅजिजने एकूणच बीएसई माहिती तंत्रज्ञान निर्देशांकाच्या नफ्यात आघाडीचे स्थान मिळविले.

शुक्रवारी सकाळी ११ वाजता बीएसई सेन्सेक्स १.०२% घसरला. यावेळी तो ५८,५२४ वर पोहोचला. निफ्टी५० निर्देशांक १.०१% ने घसरून १७,४५२ वर आला. सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, सन फार्मास्युटिकल्स आणि इन्फोसिस हे आघाडीवर होते. तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, महिंद्रा आणि महिंद्रा आणि इंडसइंड बँक हे सर्वाधिक फरकाने घसरले होते.

श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर बीएसई स्मॅल कॅपमध्ये १०% पेक्षा अधिक प्रमाणात वाढले आणि गेल्या ५२ आठवड्यांच्या उच्च पातळीवर त्यांचे व्यवहार होत होते. अॅपकोटेक्स इंडस्ट्रीज आणि गायत्री प्रोजेक्ट्स या दोन्ही कंपन्यांचे शेअर ६% पेक्षा अधिक वाढल्यामुळे समभागांमध्ये गुंतवणूकदारांकडून लक्षणीय खरेदी झाल्याचे स्पष्ट होते.

शुक्रवारी अप्पर सर्किटमध्ये झेपावलेल्या काही पेनी स्टॉकची यादी पुढीलप्रमाणे आहे. गुंतवणूकदारांनी आगामी सत्रांसाठी अशा समभागांवर नजर ठेवावी –