United Nations: दहशतवादावरून परराष्ट्र मंत्र्यांनी चीन, पाकिस्तानला खडसावले
ताज्या बातम्या

United Nations: दहशतवादावरून परराष्ट्र मंत्र्यांनी चीन, पाकिस्तानला खडसावले

नवी दिल्ली : दहशतवादावरून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला खडसावलं आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आणि रक्तपातास समर्थन करणाऱ्या देशांच्या वक्तव्याला खपवून घेतले जाणार नाही असं संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत परराष्ट्र मंत्र्याने चीन आणि पाकिस्तानला ठामपणे सांगितलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या साधारण अधिवेशनात ते बोलत होते. (Foreign Affairs Minister S. Jayshankar on Pakistan And China Terrorism)”भारत अनेक वर्षापासून अशा गोष्टी सहन करत आला आहे. आमच्या मते कुणीही दहशतवादाला समर्थन देणे चुकीचे आहे. त्याचबरोबर दहशतवादाच्या कोणत्याही कृत्याचे समर्थन आपण करू शकत नाही. कारण दहशतवादाला समर्थन म्हणजे रक्तपाताला समर्थन होय” असं जयशंकर म्हणाले. अनेक दशकांपासून सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया आम्ही सहन करत आलोय. त्यामुळे आम्ही कोणत्याही दहशतवादी कारवाईचे समर्थन करत नसल्याचं परराष्ट्रमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं आहे.Recommended Articlesसरकार शेतकरी,तरुणांना आत्महत्या करण्यास भाग पाडतंय: शरद पवारांची मोदींवर टिकादेशाचे माजी उप-पंतप्रधान स्व.चौधरी देवालाल यांची जयंती निमित्त रविवारी इंडियन नेशनल लोकदलचे फतेहाबाद मध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशातील विरोधी पक्षातील दिग्गज नेते मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, रा2 hours agoभारतीयांसाठी व्हीएटनामचे ‘चाओ मुंग’मुंबई : कोरोनाचा कालखंड मागे पडल्यानंतर व्हिएतनाम या पॅसिफिक महासागराचा शेजार लाभलेल्या देशाने भारतीय पर्यटकांचे स्वागत (चाओ मुंग) करण्यासाठी अनेक सोयीसुविधा देऊ केल्या आहेत. तेथील अनेक आकर्षक पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी सज्ज झाली आहेत. 2 hours agoNashik : शेतमाल विक्रीसाठी तारेवरची कसरत; कुंदर वस्ती शिवारातील विदारक चित्र नामपूर : गेल्या सहा- सात महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याला बाजार समित्यांमध्ये भाव मिळत नसल्याने कवडीमोल भावात शेतकऱ्यांकडून कांद्याची विक्री सुरू आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कांद्याची विक्री करण्यासाठी निताणे (ता. बागलाण) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जीव धोक्यात घ2 hours agoNashik : डाऊनी कोबीच्या मुळावर शेतकऱ्यांची चिंता वाढली देवळा: कसमादे भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात कोबी लागवड झाली असली तरी या पिकावर डाऊनी रोगाने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. अतिवृष्टीने लाल कांद्याची रोपे व टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकाचे आधीच नुकसान झाले असून, चाळीत साठवणूक करून ठेवलेला उन्हाळी कांदाही3 hours agoहेही वाचा: Raigad Fort : रायगडावरील शिवसमाधीजवळ पिंडदानाचा कार्यक्रम? घटनेचा Video Viralभारत, अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य मित्र देशांनी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी चीनकडून अडथळा आणला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला जागतिक दहशतवादी जाहीर करण्याच्या अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात मांडलेल्या आणि भारताने सह-समर्थित केलेल्या प्रस्तावाला चीनने विरोध केला आहे. या प्रकारावरून एस. जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांवर बोट ठेवलं आहे.