T-20 World Cup 2007: पंधरावर्षापूर्वी रचला असा इतिहास की क्रिकेटचं विश्वच पालटलंं
क्रीडा

T-20 World Cup 2007: पंधरावर्षापूर्वी रचला असा इतिहास की क्रिकेटचं विश्वच पालटलंं

आज t- 20 वर्ल्डकप जिंकुन तब्बल १५ वर्षे झाली. पण या १५ वर्षाआधी भारतीय क्रिकेटचं चित्र लोकांच्या नजरेत हलाखीचं होत. भारतीय क्रिकेट संघ फक्त स्पर्धेत भाग घेतो, जिंकत नाही.. मग कशाला मॅच बघायची अशी एकंदरीत लोकांचा दृष्टीकोन होता.खरं तर या पहिल्यांदा होऊ घातलेल्या t- 20 वर्ल्डकपला कोणीच सीरिअसली घेतलं नव्हतं . आजचे दिग्गज अन् त्यावेळचे सीनिअर खेळाडू सचिन तेंडूलकर, सौरव गांगूली अन् राहूल द्रविड यांनी चक्क माघार घेतली. मग अशात कर्णधार पद कोणाला दयायचं हा प्रश्न होता. आण मग त्यावेळी एम एस धोनीचं नाव समोर आलं.हेही वाचा: MS Dhoni Mentor : मेटॉर होणं पडणार महागात; बीसीसीआयची धोनीला तंबी कर्णधार म्हणून धोनीची ही पहिली परीक्षा होती. भारताच्या गटात स्कॉटलंड आणि पाकिस्तानचे संघ होते. स्कॉटलंडविरुद्ध टीम इंडियाचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. बॉल आऊटमध्ये भारताने चक्क विजय मिळवला अन् सुपर सिक्समध्ये स्थान मिळवले. मात्र पुढे न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात भारताला 10 धावांनी पराभव सहन करावा लागला. वाटलं आता टीम इंडियाची गाडी घसरतीला लागली. पुढील सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध होता आणि सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हे दोन्ही सामने जिंकणे खुप गरजेचं होतं. आव्हान तसं तगडं होतं. मात्र युवा भारतानं तेही पार केलं. इंग्लंडविरुद्ध सामन्यात तर युवराज सिंह वेगळ्यात मूडमध्ये होता. त्याने तर एक वेगळाच रेक़ॉर्ड बनवला. युवीने स्टुअर्ट ब्रॉड यांच्या एका ओव्हरमध्ये सलग 6 षटकार ठोकले अन् अख्खा गेमच पालटला. ते विक्रमी षटक कोणीच विसरु शकत नाही.Recommended ArticlesAmey Vs Sumeet Raghwan: ‘कोण किती पाण्यात बघुच उद्या!’ अमेय- सुमितची जुंपली Amey Wagh Vs Sumeet Raghwan: अभिनेता अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यातील वाद आता चांगलाच रंगताना दिसतोय. आज दिवसभर या दोन्ही अभिनेत्यांमधील वादानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु आहे हे मात्र नेटकऱ्यांना समजलेलं नाही. अनेकांना हे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन वाटते1 hours agoभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना हे नियम पाळातुम्हाला भरपूर भाज्या आणून फ्रीजमध्ये ठेवायची सवय असेल तर काही नियम पाळा. 1 hours agoतळेगाव ढमढेरे येथे मिरवणुकी अभावी बैलपोळा साजरातळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे येथे लंपी आजाराच्या भीतीमुळे सर्व शेतकऱ्यांनी मिरवणूक न काढता व कसल्याही प्रकारचा डमडोल न करता साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला. बैल पोळ्यानिमित्त बैलाला पाण्याने अंघोळ घातली, रंग दिला, तसेच महिलांनी पारंपारिक पद्धतीने बैलांची पूजा करून पुरणपोळीचा घास बैलांन1 hours agoNana Patole on Devendra Fadanvis : मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही करत हे आता कळालं? पाटोळेंचा टोमणा३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्ष चांगलीच खिल्ली उडवत आहेत, यातच नाना पाटोळे यांनी फडवीसांना चांगलाच टोमणा केला.1 hours agoहेही वाचा: MS Dhoni: एमएस धोनीने इंग्लंडमध्ये घेतली भारतीय खेळाडूंची भेटसेमीफायनलमध्ये ऑस्ट्रलियाविरुद्ध खेळताना युवी पुन्हा चमकला अन् 30 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार लावत ७० धावा काढल्या पुढे श्रीसंथच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलिया संघही झुकला आणि भारताच्या युवा संघानं थेट फायनलपर्यंत धडक मारली. वर्ल्डकप फायनलमध्ये प्रथमच भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येत होते. जरी भारताने पाकिस्तानचा साखळी फेरीत बॉल आऊटवर पराभव केला असला तरी सचिन, द्रविड आणि गांगुलीच्या अनुपस्थितीत या अंतिम सामन्याचं दडपण वेगळंच होतं.पाकिस्तानविरुद्ध मॅच असणे ही भारतासाठी नेहमी खुप भावनिक गोष्ट असते. कधीही सिरीअस न घेणाऱ्या भारतीय संघाला त्यावेळी फायनलमध्ये लोक वेड्यासारखे बघायला तयार होते. हे महायुद्ध बघण्यासाठी जागोजागी स्क्रिन उभ्या करण्यात आल्या. सगळीकडे एकच चर्चा होती की वर्ल्डकप कोण उचलणार?हेही वाचा: MS Dhoni |’फेव्हरेट’ नदालच्या झुंजार विजयाचा धोनी साक्षीदार जोहान्सबर्गमध्ये झालेल्या या फायनलमध्ये भारताने 20  ओव्हरमध्ये 157 धावा केल्या. सामना शेवटच्या टप्प्यात असताना पाकिस्तानला फक्त 13 धावांची गरज होती आणि पण पाकिस्तानचं बॅ़डलक म्हणाव की काय नेमकं शेवटच्या ओव्हरमध्ये श्रीसंत नी मिस्बाह-उल-हकचा पकडला अन् भारताने पहिला आयसीसी वर्ल्डकप जिंकला आणि यांच श्रेय मिळालं धोनीला.कुणाला वाटलंही नसेल की पहिल्यांदा कॅप्टन्सीची धुरा खांद्यवर घेणारा हा तरुण चक्क इतिहास गाजवेल पण धोनीने करुन दाखवलं आणि T- 20 वर्ल्डकप जिंकून आणला. या वर्ल्डकपपासून दुळी-दुबळी समजली जाणारी भारतीय टिम पुन्हा सगळ्यांच्याच नजरेत यायला लागली.हेही वाचा: Yuvraj Singh : बापानं मुलाला दिलं ‘6 सिक्सेस’चं बाळकडू; VIDEO होतोय व्हायरलखरं तर तिथनंच भारतीय क्रिकेटचा सोनेरी काळ सुरू झाला. 2007 च्या वर्ल्डकप मधील जबरा परफॉर्मन्स बघून बीसीसीआने दुसऱ्याच वर्षी म्हणजे 2008 साली आयपीएल ची घोषणा केली. ही आयपीएल बीसीसीआयसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली. आता तर आयपीएल मीडिया राईट्स विक्रीने 50 हजार कोटींचा टप्पा गाठला आहे. या सर्वाला धोनीच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघाने 2007 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये केलेली दैदिप्यमान कामगिरी कारणीभूत आहे.