IND vs AUS: हैदराबादमध्ये इतिहास रचण्याची संधी, भारत मालिका जिंकण्याच्या तयारीत
क्रीडा

IND vs AUS: हैदराबादमध्ये इतिहास रचण्याची संधी, भारत मालिका जिंकण्याच्या तयारीत

India vs Australia 3rd t20 Match : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ आज येथे होणाऱ्या अखेरच्या टी-20 लढतीत मालिका विजयाचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवणार हे निश्चित आहे. मोहालीत पराभूत झाल्यानंतर नागपूरमधील दुसऱ्या टी-20 लढतीत 6 गडी राखून विजय साकारल्यानंतर आता टीम इंडिया विश्वकरंडकाआधी मालिका विजयाला गवसणी घालून आत्मविश्वास मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. अर्थात भारतीय संघाला यानंतर दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करावयाचे आहेत; पण त्याआधी हर्षल पटेल व युझवेंद्र चहलचा फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय असणार आहे.हेही वाचा: Jhulan Goswami : अलविदा झूलन! भारतीय संघाने इंग्लंडचा केला सूपडा साफकर्णधार रोहित, के. एल. राहुल व विराट कोहली या पहिल्या तीन क्रमांकाच्या फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य असायला हवे. गेल्या काही सामन्यांमध्ये या तीन फलंदाजांकडून सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव दिसून येत आहे. सूर्यकुमार यादवकडून मोठ्या अपेक्षा आहेत, पण त्याचा फलंदाजी फॉर्मही चढ-उतारामधून जात आहे. आयपीएलपासून हार्दिक पंड्याच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. फलंदाजी तसेच गोलंदाजी या दोन्हीमध्ये त्याने. आपला ठसा उमटवला आहे. दिनेश कार्तिकने नागपूर लढतीत फिनीशर म्हणून आपली ओळख जपली.Recommended ArticlesPune : कात्रज तलावात बूडून एकाचा मृत्यूकात्रज : नानासाहेब पेशवे तलावात एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी काही तरुण निघाले होते. त्यावेळी काहीजण बोटीने पुतळ्याच्या ठिकाणी पोहोचले. मात्र, ज्ञानेश्वर पांचाळ (वय3 hours agoJalgaon : रस्त्यावरील खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी मोठा वाघोदा (ता. रावेर) : महामार्गावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी गेल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) घडली. वाघोदा बुद्रुक येथील नारायण साहेबराव धामोडे (वय ३३) हा रात्री काम संपवून घरी जाण्यासाठी निघाला होता.(young man killed in accident due to potholes on road jalgaon latest news)3 hours agoManmad : रेल्वेकडून ज्येष्ठांच्या खिशाला कात्री! प्रवासातील सवलतींअभावी भुर्दंड मनमाड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानमित्त एसटी महामंडळाने ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. तर दुसरीकडे मात्र रेल्वे प्रशासनाकडून दिली जाणारी तिकीट दरातील सवलत अद्यापही बंद असल्याने ज्येष्ठांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वेल3 hours agoपेठवडगाव:झिम्मा फुगडी स्पर्धेत महालक्ष्मी ग्रुप प्रथम01763——वडगाव, पंडेवाडीचा महालक्ष्मी ग्रुप प्रथमकल्याणी सखी मंचतर्फे झिम्मा-फुगडी स्पर्धा; दोन गटांत आयोजनपेठवडगाव, ता. २४ : येथील कल्याणी सखी मंचच्या वतीने आयोजीत झिम्मा-फुगडी स्पर्धेत पेठवडगावच्या महालक्ष्मी ग्रुप व पंडेवाडी महालक्ष्मी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धा दोन गटांत 3 hours agoहेही वाचा: Video : लॉर्ड्सवर दीप्तीने असे काही केले की इंग्लंडचे खेळाडू ढसाढसा रडलेगोलंदाजांनी सुधारणा करावी जसप्रीत बुमराहचे दुसऱ्या लढतीत पुनरागमन झाले. त्याने अॅरॉन फिंचचा त्रिफळा उडवला आणि भारतासाठी निर्णायक कामगिरी बजावली. अक्षर पटेल यानेही दोन षटकांमध्ये प्रभावी कामगिरी केली, पण हर्षल पटेल व युझवेंद्र चहल यांच्या कामगिरीत सुधारणा आवश्यक आहे. मॅक्सवेलकडून अपेक्षा ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला पहिल्या दोन लढतींत फक्त एकच धाव करता आली आहे. कांगारुंना उद्याच्या लढतीत त्याच्याकडून अपेक्षा आहेत. तसेच पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, डॅनियल सॅम्स, सीन अॅबॉट या वेगवान गोलंदाजांनीही अपेक्षित कामगिरी केली नाही. ॲडम झाम्पा या फिरकी गोलंदाजाने आपली चुणूक दाखवली. त्याच्याकडून पुनरावृत्तीची अपेक्षा असणार आहे. टीम डेव्हिडवरही सगळ्यांच्या नजरा असतील.आजची तिसरी लढत हैदराबाद, सायंकाळी ७ वाजल्यापासून