IND vs AUS : तिसऱ्या सामन्यात होणार पंतची हकालपट्टी, हे आहे प्रमुख कारण
क्रीडा

IND vs AUS : तिसऱ्या सामन्यात होणार पंतची हकालपट्टी, हे आहे प्रमुख कारण

India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. मालिकेतील दुसरा सामना नागपुरात झाला होता. पावसाने व्यत्यय आणलेला हा सामना केवळ 8-8 षटकांचा झाला. ज्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. रोहित शर्माने या मॅचमध्ये कमी ओव्हर्समुळे एक बॉलर कमी खेळवून ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं होतं. हैदराबादमध्ये रोहित पुन्हा एकदा 5 गोलंदाजांसह मैदानात उतरेल.हेही वाचा: INDvsENG ‘आम्ही चुकीचं केलं…’; ‘त्या’ विकेटच्या वादावर कॅप्टन कौरने सोडले मौननागपूर टी-20 मध्ये भारताने जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल या चार गोलंदाजांसह मैदानात उतरले होती. त्याचवेळी हार्दिक पांड्या संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावत आहे. निर्णायक सामन्यात रोहित शर्माला धोका पत्करायचा नाही. हार्दिक पांड्यासह एकूण 6 गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. जर तो अतिरिक्त गोलंदाज खेळला तर ऋषभ पंत संघाबाहेर जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा कोणाला संधी देणार ?Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : कांगारूंचा निम्मा संघ माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म39 minutes agoMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज47 minutes agoNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु50 minutes agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स56 minutes agoहेही वाचा: What Is Mankading : ‘मंकडिंग’ म्हणजे काय माहितीये? जाणून घ्या सुरुवात कशी झालीभारतासमोर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहरच्या रूपात दोन पर्याय आहेत. उमेश यादव देखील भारतीय संघाचा एक भाग असला तरी तो टी-20 विश्वचषक संघात नाही. त्यामुळे रोहित भुवी किंवा चहरला संधी देण्याचा विचार करेल. दीपक चहर राखीव खेळाडू म्हणून टी-20 विश्वचषक खेळणार आहे. भुवनेश्वर कुमारला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात संधी देण्यात आली होती. अशा परिस्थितीत दीपक चहरला विश्वचषकापूर्वी सरावाची संधी मिळावी, अशी रोहितची इच्छा आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार/दीपक चहर, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल