UNGA : ‘शांततेबद्दल बोलून दहशतवाद पसरवणं हे तुमचं काम’; पाकिस्तानच्या आरोपांवर भारताचा पलटवार
ताज्या बातम्या

UNGA : ‘शांततेबद्दल बोलून दहशतवाद पसरवणं हे तुमचं काम’; पाकिस्तानच्या आरोपांवर भारताचा पलटवार

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत (United Nations General Assembly) आज भारतानं पाकिस्तानच्या (India vs Pakistan) खोट्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिलं. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या मिशनचे प्रथम सेक्रेटरी मिजितो विनिटो (Mijito Vinito) यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतावर खोटे आरोप केले, हे खेदजनक असल्याचं म्हटलंय.पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या देशात सुरू असलेले गैरप्रकार लपवण्यासाठी या व्यासपीठाचा उघडपणे गैरवापर केलाय. जो देश आपल्याला आपल्या शेजाऱ्यांसोबत शांतता हवीय असा दावा करतो, तो कधीही सीमेपलीकडील दहशतवादाला प्रोत्साहित करणार नाही किंवा मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या (Mumbai Terror Attack) सूत्रधारांना आश्रय देणार नाही, असं त्यांनी पाकिस्तानला सुनावलं.Recommended ArticlesMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज1 hours agoNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु1 hours agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoहेही वाचा: Anna Hazare : वाईन विक्रीच्या धोरणावरुन अण्णा हजारे संतापले; सरकारला दिला थेट इशारापाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Pakistan PM Shehbaz Sharif) यांनी या मंचावरून भारताला लक्ष केलंय. युद्ध हा काही उपाय नाही. शांततापूर्ण संवादानंच काश्मीर प्रश्न सुटू शकतो, असं त्यांनी म्हटलं होतं. त्याला भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय.हेही वाचा: Congress : दोन दशकांनंतर काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवातभारतावर खोटे आरोप करण्याआधी पाकिस्ताननं स्वतःच्या काळ्या कारभाराचं स्पष्टीकरण द्यावं. जम्मू-काश्मीरवर दावा करण्याऐवजी इस्लामाबादनं सीमेपलीकडील दहशतवाद थांबवावा, असा सल्ला विनिटो यांनी पाकिस्तानला दिलाय. विनितो पुढं म्हणाले, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरूच आहेत. अल्पसंख्याक समाजातील हजारो तरुणींचं अपहरण केलं जात आहे. पाकिस्तानात हिंदू, शीख आणि ख्रिश्चन कुटुंबातील मुलींचं बळजबरीनं अपहरण केलं जातं, त्यांचं लग्न केलं जातं आणि नंतर धर्मांतर करायला भाग पाडलं जातं. जगातील इतर देशांनी याची दखल घेतली पाहिजे. मानवी हक्कांबद्दल, अल्पसंख्याकांच्या हक्कांबद्दल आणि मूलभूत शालीनतेबद्दल ही चिंतेची बाब आहे, असंही विनितो यांनी स्पष्ट केलं.