IND vs AUS: हैदराबाद T20 सामन्याच्या तिकीट विक्रीत काळाबाजार?
क्रीडा

IND vs AUS: हैदराबाद T20 सामन्याच्या तिकीट विक्रीत काळाबाजार?

India-Australia T20 match tickets hyderabad : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना हैदराबादमध्ये खेळल्या जाणार आहे. रविवारी 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना होण्याआधी तिकीट विक्री मध्ये काळाबाजार झाला अशा बातम्या आल्या होत्या. त्यानंतर तिकीट विक्रीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. आता हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी आपली बाजू मांडली आहे.हेही वाचा: Rahul Dravid : नागपूर… पाऊस… अन् सासूरवाडीवरून जाफरने राहुल द्रविडला काढला चिमटासिकंदराबाद येथील जिमखाना मैदानावर तिकीट विक्रीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान अनेक क्रिकेट चाहते जखमी झाले. आता या घटनेवर भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन म्हणाला की, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने काहीही चुकीचे केलेले नाही. या घटनेबद्दल त्यांनी शोकही व्यक्त केला. राज्य क्रिकेट असोसिएशनही जखमींना मदत करेल, असेही अझरुद्दीने सांगितले.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 56 minutes agoपाकिस्तान जिंदाबाद घोषणांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात शनिवारी पुण्यात आंदोलन केलं. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 60 minutes agoNashik : महिलांचा रुद्रावतार; अवैध दारू विक्री ठिकाणीएक तास रस्ता रोको आंदोलन ओझर,दिक्षी (ता, निफाड) गावात आदिवासी महिलांनी ग्रामपंचायतीसह यंत्रणेला निवेदन देऊन ही दारू विक्री सुरूच होती. शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी गावातीलच वस्तीत महिलेच्या घरी पुन्हा दारू सापडल्याने दिक्षीतील महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट अवैद्द दारू अड्ड्यावर जात दारूच्या बाटल्या फोडल्या. अनेक 1 hours agoडोंबिवली : ‘सण उत्सवांवर वारेमाप खर्च… समस्या गेल्या वर्षी प्रमाणेचडोंबिवली : ‘’गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही…’’ असेच काहीसे कल्याण डोंबिवली शहरातील समस्यांचे झाले आहे. मुलभूत समस्यांकडे नागरिकांचे फारसे लक्ष जाऊ नये म्हणून राजकीय पक्षांकडून विविध सण उत्सवांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव सुरु झाला असून दांडिया उत्सव पक्षांकडून आयोजित क1 hours agoहेही वाचा: Dinesh Karthik : 2 बाॅलमध्येच संपवली मॅच; परफेक्ट फिनिशर म्हणाला, मी कोणतंही श्रेय…तिकीट विक्रीत काळाबाजार यावर बोलताना एचसीएचे अध्यक्ष अझरुद्दीनने सांगितले की, एका कंपनीला या सामन्याची ऑनलाइन आणि ऑफलाईन तिकिटे विकण्याचे काम सोपवण्यात आले आहे. तिकीट विक्रीत मध्ये कोणताही काळा बाजार झालेला नाही. जर कोणी केला असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करू. एखाद्याने ऑनलाइन तिकीट खरेदी करून ते काळा बाजार विकले असेल तर त्याच्याशी एचसीएचा काहीही संबंध नाही.अझरुद्दीनने गुरुवारची घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले पुढे बोलताना म्हणाला की, हैदराबादला बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक लोक सामना स्टेडियममध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. एचसीएचे सचिव विजयानंद यांनी सांगितले की, तिकीट विक्रीदरम्यान झालेल्या घटनेबाबत युनियनने एक समिती स्थापन केली आहे. जखमींना मदत करेल असे आश्वासन दिले.