३२ हजारात मिळतोय iPhone 12, या ठिकाणाहून खरेदी करा
इन्फोटेक

३२ हजारात मिळतोय iPhone 12, या ठिकाणाहून खरेदी करा

नवी दिल्लीः जर तुम्ही आयफोन खरेदी करायचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कारण, आयफोन वर बंपर डिस्काउंट सुरू आहे. आयफोन १२ खरेदी करण्याचा विचार असेल तर तुम्ही फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर सध्या सुरू असलेल्या या सेलमध्ये आयफोन १२ ला खूपच स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. iPhone 12 (64GB) ला Flipkart वरून फक्त ३२ हजार रुपये किंमतीत खरेदी करू शकतात. जाणून घ्या डिटेल्स.

Flipkart Big Billion Days Sale मध्ये iPhone 12 वर ९ टक्के डिस्काउंट सुरू आहे. फोनला डिस्काउंट नंतर ५३ हजार ९९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफर मध्ये फोन खरेदी केल्यानंतर तुम्हाला १६ हजार ९०० रुपयाची सूट मिळते. ही ऑफर १२८ जीबी आणि २५६ जीबी व्हेरियंट वर सुरू आहे. १२८ जीबी व्हेरियंटची किंमत ५८ हजार ९९० रुपये आहे. तसेच २५६ जीबी व्हेरियंटची किंमत ६७ हजार ९९० रुपये आहे.

iPhone 12 (64GB) ला Amazon वरून खरेदी करू शकता. आयफोन १२ वर २९ टक्के डिस्काउंट मिळत आहे. डिस्काउंट नंतर iPhone 12 (64GB) ला ४६ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. तर १२८ जीबी आणि २५६ जीबी व्हेरियंटसाठी तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागेल. १२८ जीबी व्हेरियंटची किंमत ५२ हजार ९९९ रुपये आहे. २५६ जीबी व्हेरियंटची किंमत ६० हजार ९९९ रुपये आहे. यावर एक्सचेंज ऑफर सुद्धा सुरू आहे. एक्सचेंज ऑफर मध्ये तुम्हाला १४ हजार २५० रुपयाची सूट मिळू शकते.

आयफोन शिवाय, Flipkart आणि Amazon वर अनेक अन्य स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळत आहे. अमेझॉनवर अँड्रॉयड स्मार्टफोन्स खूपच स्वस्तात मिळत आहे. Samsung Galaxy M13 वर तगडा डिस्काउंट मिळत आहे. Samsung Galaxy M13 ची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, यावर ३७ टक्के डिस्काउंट नंतर ९ हजार ४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.