Iran Hijab Row : ‘हिजाब’विरोधात इराणी महिला आक्रमक; 700 जणींना अटक, 41 लोकांचा मृत्यू
ताज्या बातम्या

Iran Hijab Row : ‘हिजाब’विरोधात इराणी महिला आक्रमक; 700 जणींना अटक, 41 लोकांचा मृत्यू

Iran Hijab Row : इराणमध्ये महिला (Iran Women) पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत. हिजाबला हवेत फेकत त्या इराणमधील धार्मिक पोलिसांच्या (Morality Police Iran) विरोधात घोषणाबाजी करत आहेत. पोलिसांच्या मारहाणीमुळं 22 वर्षीय महसा अमीनी हीचा मृत्यू झाल्यानं महिला संतापल्या आहेत. तीचा दोष एवढाच होता की, तिनं हिजाब नीट परिधान केलेला नव्हता.इराणी महिलांना हिजाब घालण्याची अट 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर लागू झाली. त्यापूर्वी, शाह पहलवीच्या राजवटीत इराण स्त्रियांच्या पोशाखाच्या बाबतीत पूर्णपणे स्वतंत्र होता. मात्र, आता चुकीच्या पद्धतीनं हिजाब परिधान केल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मेहसा अमीनीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये हिजाबविरोधात उग्र निदर्शनं होत आहेत. Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अखेर भुवनेश्वरने दिला ग्रीनच्या तुफानी खेळीला रेड सिग्नलIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 2 hours agoPune Crime: मैत्रीणीसोबत गप्पा मारत बसलेल्या युवकांची निर्घृण हत्यापुणे – पुण्यातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाच्या डोक्यात दारूची बॉटल आणि झाडाची कुंडी घालून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. Pu2 hours agoNashik : लहान मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा ; पोलिसांचे आवाहनमालेगाव: राज्यात लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु आहेत. लहान मुले चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मिडीयावर झळकत आहेत. या अफवांमुळे शहरासह परिसरात भितीचे वातावरण आहे. पालक यामुळे चिंतेत असून, काही पालक मुलांना शाळेत पाठविण्यास2 hours agoAmey Vs Sumeet Raghwan: ‘कोण किती पाण्यात बघुच उद्या!’ अमेय- सुमितची जुंपली Amey Wagh Vs Sumeet Raghwan: अभिनेता अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यातील वाद आता चांगलाच रंगताना दिसतोय. आज दिवसभर या दोन्ही अभिनेत्यांमधील वादानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु आहे हे मात्र नेटकऱ्यांना समजलेलं नाही. अनेकांना हे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन वाटते2 hours agoहेही वाचा: Sachin Pilot : सचिन पायलटच होणार राजस्थानचे नवे मुख्यमंत्री? आज काँग्रेस आमदारांची महत्वपूर्ण बैठकएकीकडं हे आंदोलन हळूहळू मोठं होत असताना दुसरीकडं पोलीस आणि प्रशासन महिलांवर आक्रमक कारवाई करत आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, इराणमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये किमान 41 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी 700 हून अधिक महिलांना अटक करण्यात आली आहे. हेही वाचा: UNSC : भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्य बनवा; अमेरिकेनंतर रशियाचाही पाठिंबासोशल मीडियावर बंदीएवढंच नाही तर इराण सरकारनं व्हॉट्सअॅप, स्काईप, लिंक्डइन आणि इन्स्टाग्राम यांसारख्या संवाद माध्यमांवर बंदी घातली आहे. या कारवाईत शेकडो कार्यकर्ते आणि पत्रकारांनाही अटक करण्यात आली आहे. इराणच्या सरकारी टेलिव्हिजननं मृतांची संख्या 41 असल्याचं सांगितलं. तर इराण सरकारच्या म्हणण्यानुसार, आंदोलकांनी सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेला आग लावली असून त्यामुळं सर्वांवर ही कारवाई करण्यात येत आहे, असं स्पष्ट केलं.हेही वाचा: Pinarayi Vijayan : ‘लोकांना वाटलं होतं राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील; पण आता त्यांना कळून चुकलंय’या संपूर्ण प्रकरणादरम्यान इराण ह्युमन राइट्सनं दावा केलाय की, सुरक्षा कर्मचारी वगळता मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 54 आहे. मझांदरान आणि गिलान प्रांतांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. इथं आंदोलन करणाऱ्या महिलांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावाही अधिकार गटांनी केला आहे.