महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर इराण आता आगीत होरपळत आहे. इराणमध्ये हिजाबविरोधातील निदर्शनांना आता हिंसक वळण लागले आहे. हिजाब जाळण्यासाठी पेटवलेली आग आता इराणमधील अनेक शहरे जाळून टाकू शकते. हिजाबच्या विरोधात निषेध आणि आक्रमकता जास्त प्रमाणात पसरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी स्त्रिया हिजाब जाळत होत्या आणि आता लोक गोंधळ करून सरकारी मालमत्ता जाळण्याच्या प्रयत्न करत आहेत.इराणमधील अनेक शहरांमध्ये वाढता हिंसाचार पाहता लोकांनी अफवा टाळून हिंसक होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करावी लागली आहे.इराणमध्ये कमी-अधिक प्रमाणात निदर्शने होत आहेत. एके ठिकाणी आंदोलक बाहेर आले मोठ्या प्रमाणावर त्यांची गर्दी झाली. आंदोलकांनी सुरक्षारक्षकांना खूप मारहाण केली. त्यामध्ये दिवांदरेह शहरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या कुर्दिश प्रदेशाचा हा भाग आहे, जिथे हिजाबच्या विरोधात सर्वाधिक निदर्शने होत आहेत. Recommended Articlesबारामती बाजार समिती कापसाची खरेदी विक्री सुरु करणारबारामती : पुढील महिन्यापासून बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची खरेदी विक्री सुरु केली जाणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 19 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. प्रशासक व सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे, बाजार समि3 hours agoVaibhav tatwawadi birthday: पूजा सावंतची पोस्ट बघाच, याला शुभेच्छा म्हणायच की?Vaibhav tatwawadi birthday: ‘बाजीराव मस्तानी’, ‘कॉफी आणि बरच काही’, ‘पॉन्डीचेरी’ आणि अशा अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या अभिनेता वैभव तत्ववादीचा आज वाढदिवस. वैभव आज त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करतो आहे. मराठी त्याचप्रमाणे हिंदी सिनेमा, वेब सीरिज यामध्ये आपल्या अभिन3 hours agoमहिंद्राने पुन्हा परत मागवल्या XUV700 अन् Thar, जाणून घ्या कारणमहिंद्रा XUV700 आणि थार दोन्ही वाहनांच्या टर्बोचार्जरमध्ये समस्या आल्यानंतर या दोन्ही गाड्या कंपनीकडून परत मागवल्या जात आहेत. दरम्यान महिंद्राची XUV700 परत मागवण्याची ही पहिलीच वेळ नाही. या गाड्या रिकॉल केल्यामुळे ग्राहकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते.3 hours agoरात्रीच्या शिळ्या डाळीपासून हे पदार्थ करारात्रीची शिळी डाळ फेकण्यापेक्षा त्यापासून इतर पदार्थ तयार करता येतील. 3 hours agoइराणमध्ये अनेक आंदोलकांना अटक केल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनीही महसा अमिनी यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला असून मृत्यूची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, इराणच्या विरोधकांचा हा सुनियोजित कारस्थान असल्याचेही अध्यक्ष रायसी सांगत आहेत. हिजाब न घातल्याने पोलिसांनी कुटुंबासह तेहरानला भेट देण्यासाठी आलेल्या मेहसा अमिनीला ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला.दुसरीकडे, इराणचे पोलीस मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप फेटाळत आहेत. महसा अमिनी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेतील जनता इराणच्या शूर महिलांच्या पाठीशी उभी आहे. यूएनजीएमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन बोलत होते आणि त्यांनी इराणच्या मुद्द्याचाही उल्लेख केला होता. अमेरिकेतील जनता इराणच्या शूर महिलांच्या पाठीशी उभी असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यापूर्वी भारतातूनही इराणी महिलांच्या समर्थनार्थ आवाज उठवण्यात आला होता.
Iran Protest: इराणमध्ये हिजाबविरोधात हिंसक निदर्शने, अनेक शहरांमध्ये इंटरनेट सेवा बंद