Nasa : नासाच्या स्पेस टेलिस्कोपची कमाल; ३ दशकानंतर टिपले नेपच्यून ग्रहाचे तेजस्वी वलय
इन्फोटेक

Nasa : नासाच्या स्पेस टेलिस्कोपची कमाल; ३ दशकानंतर टिपले नेपच्यून ग्रहाचे तेजस्वी वलय

NASA: नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने आणखी एक कमाल केली आहे. नासाने नेपच्यून ग्रहाचा नवीन फोटो प्रसिद्ध केला आहे. या फोटोत नेपच्यून ग्रहाचे स्पष्ट आणि जवळून फोटो टिपण्यात आले आहेत. या फोटोत नेपच्यूनचे तेजस्वी वलय अगदी स्पष्ट दिसत आहे. गेल्या 30 वर्षांतील नेपच्यून ग्रहाचे हे सर्वात स्पष्ट चित्र आहे. यापुर्वी 1989 मध्ये व्हॉयेजर 2 या अंतराळ यानाने नेपच्यूनचे सर्वात जवळून फोटो घेतले होते.नेपच्यून हा ग्रह सूर्यापासून आठवा व सूर्यमालेतील सर्वांत दुरचा ग्रह आहे. नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने घेतलेल्या या चित्रात अनेक तेजस्वी वलयांच्या व्यतिरिक्त, धुळीचा एक पट्टा देखील दिसतो. Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अक्षर पटेलचा भेदक मारा; मॅथ्यू वेड देखील माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म9 minutes ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग14 minutes agoVIDEO| Axar Patel : अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत16 minutes agoहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.18 minutes agoयाबद्दल नेपच्यून सिस्टम एक्सपर्ट हेडी हॅमेल सांगतात की, आम्ही नेपच्युनच्या या धुरकट, धुळीने माखलेल्या कड्या तीन दशकांपूर्वी पाहिल्या होत्या. आम्ही त्यांना इन्फ्रारेडमध्ये पहिल्यांदाच पाहिले आहे. 1989 मध्ये नासाच्या व्हॉयेजर 2 ने नेपच्यून पहिल्यांदा पाहिला होता. तेव्हापासून या निळ्या ग्रहावर कोणतेही अंतराळयान गेलेले नाही. पण, आताच हाती आलेले नेपच्यूनचे हे फोटो संशोधकांना प्रोत्साहीत करतात.हेही वाचा: NASA : सुर्याचा रंग पिवळा नाही तर पांढरा ; नासाने केला खुलासा नेपच्यून पृथ्वीपेक्षा सूर्यापासून 30 पट जास्त दूर आहे. यासोबतच नेपच्यूनला आपण निळा ग्रह म्हणून ओळखतो. हे ग्रहावर असलेल्या मिथेन वायुमूळे होते. नेपच्यूनला गुरू आणि शनिपेक्षा हायड्रोजन आणि हेलियम सारख्या घटकांनी भरलेला आहे.सर्वात शक्तिशाली टेलिस्कोपजेम्स वेब स्पेस टेलिस्कोप हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली टेलिस्कोप आहे. पृथ्वीपासून सुमारे 1.6 दशलक्ष किलोमीटर अंतरावरील गोष्टी यात टीपता येतात. डिसेंबर 2021 मध्ये जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप लाँच करण्यात आले होते. वेबचा नियर-इन्फ्रारेड कॅमेरा (NIRCam) 0.6 ते 5 मायक्रॉनच्या नियर-इन्फ्रारेड कक्षेतील फोटो काढतो. हेही वाचा: NASA शनिवारी ‘मून रॉकेट’ लाँच करणार; पुन्हा चंद्रावर मानव पाठवण्याची तयारीकसा आहे सुर्यमालिकेतील आठवा ग्रह?नेपच्यूनचा शोध ४ ऑगस्ट १९६४ रोजी लागला होता. नेपच्युन हा ग्रह टेलिस्कोपने पाहता येतो. नेपच्यून युरेनसच्याही पुढे एक अब्ज मैल अंतरावर आहे. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणतः ४,४९८,२५२,९०० कि.मी. ( 30.06896348 A.U.) एवढे आहे. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास याला साधारणतः १९ दिवस लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास नेपच्युनला जवळपास १६५ वर्षे लागतात.