Roger federer : फेडररच्या निवृत्तीमुळे पोकळी
क्रीडा

Roger federer : फेडररच्या निवृत्तीमुळे पोकळी

लंडन : टेनिसचा राजा म्हणून ओळखला जाणारा रॉजर फेडरर शुक्रवार पासून सुरू होणाऱ्या ‘लेव्हरकप’ स्पर्धेनंतर टेनिसविश्वातून निवृत्त होत आहे. तब्बल २० वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेल्या फेडररचे टेनिसजगतातील अनेक दिग्गजांनी कौतुक केले असून आता त्यात ७ वेळा ग्रँडस्लम विजेते आणि माजी जागतिक क्रमांक १ असणारे जॉन मॅकेनरो यांचीपण भर पडली आहे. रॉजर फेडररबद्दल बोलताना जॉन मॅकेनरो म्हणाले की, ‘फेडररच्या निवृत्तीने टेनिसजगतात कधीच न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.लंडन येथे लेव्हर कपच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना जॉन मॅकेनरो म्हणाले, २० वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकणाऱ्या फेडररची उणीव नक्कीच भासणार असून तो निवृत्त होत असल्यामुळे टेनिसजगतात आता कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. मी त्याला ६ वर्षांपूर्वी विम्बल्डनच्या कोर्टवर लंगडताना बघितले होते. पायाच्या दुखापतीमुळे तो जवळपास ६ महिने टेनिसपासून दूर होता. एवढी गंभीर दुखापत होऊनही पुढच्या १८ महिन्यांत त्याने ३ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकून दाखवायची किमया साधली. फेडररला निवृत्तीनंतरचे उपदेश देण्याइतका मी मोठा नाही, असेही जॉन मॅकेनरो पुढे म्हणाले.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : पुन्हा स्लॉग ओव्हरचं दुखणं; टीम डेव्हिडकडून धुलाईIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म1 minutes agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.7 minutes agoSolapur : अशोक लेलॅंड शोरुम मधे पाच लाखाची चोरी मोहोळ : नवीन विक्रीसाठी आणलेल्या अशोक लेलँड गाड्यांचे पाच लाख रुपयांचे डिक्ससह टायर चोरी झाल्याची घटना सावळेश्वर ता मोहोळ येथील शोरूम मध्ये, ता 24 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. या संदर्भात अज्ञात चोरटया विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.12 minutes ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग26 minutes agoसॅम्प्रास यांच्याकडूनही स्तुतीअमेरिकेचे महान टेनिसपटू पीट सॅम्प्रास यांनी रॉजर फेडरर याची स्तुती केली आहे. ते म्हणाले, तुझ्याकडे २० ग्रँडस्लॅम जेतेपदे आहेत. तू एटीपी क्रमवारीत बराच काळ नंबर वन स्थानावरही होतास. यामध्येच सर्व काही आले, असेही त्यांनी नमूद केले.