Johnson & Johnson बेबी पावडर कंपनीचा राज्यातील परवाना कायमस्वरुपी रद्द
ताज्या बातम्या

Johnson & Johnson बेबी पावडर कंपनीचा राज्यातील परवाना कायमस्वरुपी रद्द

Johnson & Johnson : जॉन्सन अँड जॉन्सन या लहान मुलांच्या पावडर कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली असून यां कंपनीचा महाराष्ट्र राज्यातील परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. या पावडरच्या वापरामुळे लहान मुलांच्या त्वचेस हानी पोहोचत असल्यामुळे प्रशासनाने मुलुंड आणि मुंबई येथील कारखान्यावर ही कारवाई केली आहे.(Johnson & Johnson Baby Powder Company Licence Cancelled)अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत सदर कंपनीच्या उत्पादनाचा सामू (PH) हा प्रमाणित मानकानुसार न आढळल्यामुळे लहान मुलांच्या त्वचेस हानी पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.Recommended ArticlesKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी20 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 20 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म24 minutes agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.37 minutes agoदरम्यान, या पावडरमुळे अनेक महिलांनी याविरोधात आरोग्याबाबत तक्रारी केल्या होत्या. ही पावडर वापरल्यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाच्या समस्या अनेक महिलांध्ये आढळून आल्या होत्या. त्याचबरोबर यामध्ये कॅन्सर निर्माण करणारे घटक असल्याचा दावाही काही अमेरिकन नियामकांनी केला होता. मात्र हे आरोप कंपनीने फेटाळून लावले होते. तसेच कंपनीच्या विरोधात सध्या तब्बल 38,000 केसेस चालू आहेत.हेही वाचा: Video: पाकिस्तानच्या पंतप्रधानाची रशियासमोर फजिती; हेडफोन लावता येईनात जॉन्सन अँड जॉन्सन या पावडरच्या नवजात बालकांसाठी वापर केला जातो पण त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत दोष आढळल्यामुळे ही प्रशासनाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली असून यानंतर या पावडरचे महाराष्ट्रातील उत्पादन थांबणार आहे. दरम्यान, या कंपनीने मागच्याच महिन्यात, २०२३ पासून जागतिक पातळीवर या पावडरची विक्री थांबवणार असल्याची घोषणा केली होती. त्याआधी या कंपनीने मागच्या वर्षात कॅनडा आणि अमेरिकेत या बेबी पावडरची विक्री थांबवली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील मुंबई, मुलुंड येथील कारखान्यावर कारवाई करत परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत.