Kuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तर
क्रीडा

Kuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तर

Kuldeep Yadav Hat-Trick : भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव कधी भारतीय संघात दिसतो तर कधी नाही. जरी संघात असला तरी त्याला मालिकेतील सर्व सामन्यात खेळण्याची संधी मिळले याची शाश्वती नसते. मात्र भारतीय ‘अ’ संघाकडून खेळणाऱ्या कुलदीप यादवने निवडसमिती आणि संघ व्यवस्थापनाला आपल्याबाबत नव्याने विचार करण्यास भाग पाडले आहे. त्याने न्यूझीलंड ‘अ’ विरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात हॅट्ट्रिक केली. कुलदीपच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडचा संघ 219 धावात गारद झाला. चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात कुलदीपने वॅन बीक, जो वॉकर आणि जेकब डफी यांना बाद करत हॅट्ट्रिक केली. हेही वाचा: Video : दुलीप ट्रॉफी पश्चिम विभागच्या नावावर; सामनावीरालाच कर्णधार रहाणेने काढले मैदानाबाहेरन्यूझीलंड अ च्या डावातील 47 व्या षटकात कुलदीपने चौथ्या चेंडूवर एक विकेट घेतली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर वॉकरला संजू सॅमसनकडे झेल देण्यास भाग पाडले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीपने जेकबला पायचीत बाद करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केले. या सामन्यात कुलदीपने 10 षटकात 51 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. कुलदीपबरोबरच ऋषी धवनने 2 तर राहुल चाहरने 2 विकेट्स घेतल्या. उमारन मलिक आणि राज बावाने प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या.Recommended Articlesत्या वक्तव्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व चव्हाणांनी गमावले ?डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांवरुन कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. मंत्री चव्हाण यांच्या डोंबिवलीतील त्या वक्तव्यानंतर शिंदे गट नाराज झाला आहे. डोंबिवलीतील शिंदे गटासह ठाकरे गटाने देखील चव्हाण यांच्यावर रस्ते कामावरुन टिकेची 2 hours agoKhambhatki Ghat: खंबाटकी घाटात दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगापुणे-बंगळुरू महामार्गावर रविवारी दुपारी खंबाटकी घाटात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवासी बऱ्याच वेळापासून वाहनात अडकून पडले आहेत. (khambhatki ghat news in Marathi)सविस्तर वृत्त थोड्याच वेळा…3 hours agoPune : कात्रज तलावात बूडून एकाचा मृत्यूकात्रज : नानासाहेब पेशवे तलावात एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी काही तरुण निघाले होते. त्यावेळी काहीजण बोटीने पुतळ्याच्या ठिकाणी पोहोचले. मात्र, ज्ञानेश्वर पांचाळ (वय3 hours agoJalgaon : रस्त्यावरील खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी मोठा वाघोदा (ता. रावेर) : महामार्गावरील खड्ड्यांमुळे तरुणाचा बळी गेल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) घडली. वाघोदा बुद्रुक येथील नारायण साहेबराव धामोडे (वय ३३) हा रात्री काम संपवून घरी जाण्यासाठी निघाला होता.(young man killed in accident due to potholes on road jalgaon latest news)3 hours agoहेही वाचा: MS DHONI: भारताच्या वर्ल्डकप विजयासाठी कॅप्टन कूलचा खास प्लॅन, इतिहासाची करणार पुनरावृत्तीकुलदीप यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील हॅट्ट्रिक घेण्याची किमया केली आहे. कुलदीप यादवने वनडेमध्ये दोनवेळा हॅट्ट्रिक घेतली आहे. 2017 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कोलकात्यातील वनडे सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती. त्यानंतर त्याने 2019 मध्ये देखील वेस्ट इंडीज विरूद्धच्या सामन्यात हॅट्ट्रिक घेतली होती. कुलदीप यादवने अंडर 19 पासूनच हॅट्ट्रिक घेण्यास सुरूवात केली होती. त्याने 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये देखील हॅट्ट्रिक घेण्याची किमया केली होती.