‘लक्ष्मी बँके’चा परवाना रद्द; रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई; ठेवी सुरक्षित
अर्थविश्व

‘लक्ष्मी बँके’चा परवाना रद्द; रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई; ठेवी सुरक्षित

मुंबई : राज्यातील सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीत होत असलेल्या हलाखीमुळे सोलापूर येथील दि लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक या बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने (आरबीआय)गुरुवारी रद्द केला. मात्र बँकेने रिझर्व्ह बँकेकडे दिलेल्या तपशीलानुसार ९९ टक्के ठेवीदारांच्या ठेवी या विमा संरक्षित असल्याने त्यांना त्यांच्या ठेवी पूर्णपणे मिळणार असल्याचे ‘आरबीआय’ने म्हटले आहे.गेल्या काही वर्षांत सहकारी साखळी बँकांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. अनेक बँका या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या आहेत. गेल्या वर्षभरात देशातील ६८ बँका बंद पडल्या आहेत, तर त्यापैकी ४२ बँका या दुसऱ्या लहान बँकांमध्ये विलीन करण्यात आल्या. त्यात राज्यातील १४ बँक या पूर्णपणे बंद पडल्या असून सात बँका या लहान बँक किंवा अन्य सक्षम बँकामध्ये विलीन करण्यात आल्या आहेत.सोलापूरमधील लक्ष्मी बँक बंद करून अवसायक नेमण्याबाबत रिझर्व्ह बँकेने सहकार आयुक्तांना निर्देश दिले आहेत. बँकेकडे पुरेसे भांडवल नाही, भविष्यात हे भांडवल विहित मर्यादेपर्यंत वाढण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. पर्यायाने ही बँक बँक नियामक कराराच्या विविध कलमांची पूर्तता करू शकत नाही. बँकेची आर्थिक स्थिती पाहता बँक सुरु ठेवण्यास परवानगी दिल्यास जनतेच्या हितास बाधा येऊ शकते, त्यामुळे या बँकेस बँकिंग व्यवहार करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे रिझर्व्ह बँकेने कळविले आहे.पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना अभयबँकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता, बँक ठेवीदारांचे पूर्ण पैसे देऊ शकत नाही. मात्र डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) कडून ठेवीदारांच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी विमा संरक्षित असल्याने या बँकेचे ठेवीदार आपल्या ठेवी मिळविण्यासाठी दावा करू शकतात. बँकेच्या ठेवीदारांच्या ठेवींचा तपशील पाहता ९९ टक्के ठेवीदार विम्यांतर्गत १०० टक्के ठेवी परत मिळविण्यास पात्र असणार आहेत. सहकार आयुक्तांकडून अवसायनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विमा संरक्षण कायद्यानुसार पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींसाठी दावा करू शकतात. या वर्षभरात १३ सप्टेंबरपर्यंत ‘डीआयसीजीसी’ने १९३. ६८ कोटी रुपये ठेवीदारांना त्यांच्या ठेवींच्या बदल्यात परत केले आहेत.Recommended Articlesहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.1 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : कांगारूंचा निम्मा संघ माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म9 minutes agoMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज17 minutes agoNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु20 minutes ago