Monkeypox : विदेशी नागरिकांना स्पर्श करू नका; चीनचे नागरिकांना आदेश
ताज्या बातम्या

Monkeypox : विदेशी नागरिकांना स्पर्श करू नका; चीनचे नागरिकांना आदेश

Monkeypox In China : कोरोनाने सर्वाधिक फटका बसलेल्या चीनने आता मंकीपॉक्स विषाणूची धास्ती घेतली असून, चीनमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. यानंतर चीन प्रशासनाने विदेशी नागरिकांपासून आणि परदेशातून आलेल्या नागरिकांच्या त्वचेच्या संपर्कात न येण्याचे आदेश चीनच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे प्रमुख वू झुन्योऊ यांनी दिले आहेत. चीनच्या चोंगकिंग शहरात परदेशातून आलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्स झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. लागण झालेली व्यक्ती परदेशी आहे की चीनी हे अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, मंकीपॉक्सचा पहिला रूग्ण आढळून आल्यानंतर विदेशी नागरिकांच्या संपर्कात येऊ नये हे विधान वांशिक आणि भेदभाव करणारे आहे, अशी टीका अनेकांनी सोशल मीडियावरून करत आहेत. करोना साथीच्या काळात परदेशी नागरिकांनी भीतीपोटी ज्याप्रकारे चिनी नागरिकांचा संपर्क टाळला होता, हा तसाच प्रकार असल्याची पोस्ट ‘विईबो’ या संकेतस्थळाने केली आहे. Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अखेर भुवनेश्वरने दिला ग्रीनच्या तुफानी खेळीला रेड सिग्नलIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 2 hours agoPune Crime: मैत्रीणीसोबत गप्पा मारत बसलेल्या युवकांची निर्घृण हत्यापुणे – पुण्यातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे एका १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे. मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाच्या डोक्यात दारूची बॉटल आणि झाडाची कुंडी घालून खून केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. Pu2 hours agoNashik : लहान मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा ; पोलिसांचे आवाहनमालेगाव: राज्यात लहान मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु आहेत. लहान मुले चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मिडीयावर झळकत आहेत. या अफवांमुळे शहरासह परिसरात भितीचे वातावरण आहे. पालक यामुळे चिंतेत असून, काही पालक मुलांना शाळेत पाठविण्यास2 hours agoAmey Vs Sumeet Raghwan: ‘कोण किती पाण्यात बघुच उद्या!’ अमेय- सुमितची जुंपली Amey Wagh Vs Sumeet Raghwan: अभिनेता अमेय वाघ आणि सुमित राघवन यांच्यातील वाद आता चांगलाच रंगताना दिसतोय. आज दिवसभर या दोन्ही अभिनेत्यांमधील वादानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमका हा वाद कशावरुन सुरु आहे हे मात्र नेटकऱ्यांना समजलेलं नाही. अनेकांना हे एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन वाटते2 hours agoमंकीपॉक्स 90 देशांमध्ये पोहोचलामे महिन्यात जगभरात मंकीपॉक्सची लागण झालेली प्रकरणे समोर येऊ लागली. त्यानंतर आता हा विषाणू जगभरातील 90 देशांमध्ये पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली असून, जगभरात 60,000 हून अधिक जणांना याची लागण झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. भारतात 13 रूग्णजगातील विविध देशांमध्ये पसरणाऱ्या मंकीपॉक्सचे रूग्ण भारतातदेखील आढळून आले असून, आतापर्यंत या आजाराचे देशात आतापर्यंत 13 रूग्ण आढळून आले आहेत. एकट्या राजधानी दिल्लीत आठ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.