Sangli : बहुपडदा चित्रपटगृहे हाउसफुल्ल
सिनेमा

Sangli : बहुपडदा चित्रपटगृहे हाउसफुल्ल

सांगली : राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या निमित्ताने काल सुमारे साडेनऊ हजार सांगलीकरांनी चित्रपटांचा आस्वाद घेतला. ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने जाहीर केल्याप्रमाणे काल ७५ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी अभूतपूर्व आगाऊ नोंदणी केली होती. आगाऊ नोंदणीच ७० टक्क्यांहून अधिक झाली होती. प्रदीर्घ काळानंतर चित्रपटाच्या पडद्याने अशी गर्दी अनुभवली. दरवर्षी १६ सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ म्हणून पाळण्यात येतो. मात्र यंदा बहुपडदा चित्रपटगृह व्यावसायिकांनी एकत्र येऊन संघटनेच्या माध्यमातून २३ सप्टेंबर हा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्याचा प्रयत्न म्हणून कोणताही चित्रपट ७५ रुपयांच्या तिकिटात पाहता येईल, अशी घोषणा केली. विविध प्रसारमाध्यमांमधून त्याची भरपूर जाहिरातही झाली होती. सर्वस्तरांतील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.Recommended ArticlesKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी28 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 28 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म32 minutes agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.45 minutes agoसध्या चर्चेत असलेला ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट त्रिमितीय (थ्रीडी) रुपातील आहे. त्यासाठीचे चष्मा एरव्ही चाळीस रुपये भाडे आकारून मिळतो. काल मात्र तोही मोफत होता. काल प्रदर्शित होत असलेले ‘चूप’ आणि ‘धोकाझ् राऊंड द कॉर्नर’ हे नवे चित्रपट; तसेच ‘बॉईज थ्री’ हा मराठी असे चारही सिनेमे ७५ रुपयांत पाहता आले. या चित्रपटांसाठी मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असाच होता. दिवसभरात तरुणाई गटागटाने आणि सांगलीकर कुटुंबासह चित्रपटगृहापर्यंत येत होते. रात्रीच सर्व खेळ ‘हाऊसफुल्ल’ गेले. स्वरूप आणि समर्थ या चित्रपटगृहांकडे काल आठ शोंसाठी फक्त पाचशे प्रेक्षकच फिरकले होते.‘प्रेक्षकांविना’ चित्रपटाचे अर्थकारणकोरोनाच्या टाळेबंदीनंतरही चित्रपटांकडे प्रेक्षक फिरकता दिसत नाही. मोठमोठ्या बॅनरचे बहुचर्चित कोटी-कोटी खर्चाचे चित्रपट धडाधड कोसळत आहेत, तरीही निर्माते एवढा खर्च कसा करतात? मग त्यांची कमाई होते कशी? चित्रपटांचे चित्रपटगृहाबाहेरच्या प्रदर्शनाचे अधिकार, संगीत प्रदर्शनाचे अधिकार, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील प्रदर्शनाचे अधिकार यातून निर्माते बऱ्यापैकी कमाई करतात. आता ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म चित्रपट क्षेत्राच्या उत्पन्नातील मोठा आधार ठरला आहे. अनेक ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म असे बिगबजेट सिनेमे आपल्याकडेच पहिल्यांदा प्रदर्शित व्हावेत, यासाठी आग्रही असतात. वारंवार प्रदर्शनातूनही एखाद्या चित्रपटाने प्रेक्षकांची पकड घेतल्याची उदाहरणे आहेत. ‘ओटीटी’ स्मार्ट सिनेमे चित्रपटगृहातील कमाईचा फारसा विचार करीत नाहीत. लो बजेटमध्ये हे चित्रपट चांगली कमाई करून जातात. देश-विदेशातील चित्रपटगृहांची कमाई, ‘ओटीटी’, टीव्हीचे अधिकार, संगीत, रिमेकचे अधिकार अशा कमाईचा शाखाविस्तार झाला आहे.अलीकडे चित्रपटांमधूनच ‘इनबिल्ट’ अशी जाहिरात केली जाते. जसे – ज्वेलरी, माध्यम, वेशभूषा, खाद्यपदार्थाचे प्रायोजक चित्रपटांसाठी असतात. त्यातून होणारी जाहिरात आणि कमाई कोणाच्या लक्षातही येत नाही. चित्रपटाचे चित्रपटगृहांवरील यश आजही महत्त्वाचे असते. तिथे यश मिळाले की कमाईच्या अन्य विविध शाखांची कमाई कैक पटीने वाढते. एकूण कमाईत बॉक्स ऑफिसवर सुमारे पन्नास टक्के, डिजिटल अधिकारातून २० ते ३० टक्के, संगीत हक्कातून सुमारे दहा टक्के आणि उपग्रह प्रक्षेपणातून काही टक्के असे उत्पन्नाचे स्रोत असतात. या सर्व उत्पन्नस्रोताचे एकमेकांवर परिणाम होतात; ते एकमेकाला पूरक ठरतात. यात चित्रपटगृह मालक फक्त निश्‍चित वार्षिक भाड्याचे वाटेकरी उरले आहेत.