MS DHONI: भारताच्या वर्ल्डकप विजयासाठी कॅप्टन कूलचा खास प्लॅन, इतिहासाची करणार पुनरावृत्ती
क्रीडा

MS DHONI: भारताच्या वर्ल्डकप विजयासाठी कॅप्टन कूलचा खास प्लॅन, इतिहासाची करणार पुनरावृत्ती

Mahendra Singh Dhoni Announcement : टीम इंडियाचा दिग्गज महेंद्रसिंग धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारताला दोनदा विश्वविजेता बनवले. येत्या टी-20 वर्ल्डकप साठी धोनीने एक घोषणा केली. धोनी प्रत्येक फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो, असे अनेक चाहत्यांना वाटत होते. पण असे काहीही झाले नाही आणि धोनीच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.धोनीने ओरियो बिस्किट लाँच केले आहे. याबाबत त्यांनी एका व्हिडिओद्वारे हे माहिती दिली. धोनी म्हणतो की, हे बिस्किट 2011 मध्ये भारतात आले तेव्हा टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. आता पुन्हा एकदा ओरियो भारतात लाँच होत आहे, त्यामुळे या वेळेचा वर्ल्ड कपही आपणच जिंकणार आहे. धोनीने केसांची रचना तशीच ठेवली आहे, तो विनोद असला तरी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा कोणतीही पत्रकार परिषद घेतली नव्हती.Recommended Articlesबापरे! पाच राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त तिरुपती बालाजी संस्थानाची संपत्तीTirumala Tirupati Devasthan Trust Property : तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD), या जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्टने अखेर त्यांच्या एकूण मालमत्ता किती याबद्दल माहिती उघड केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंदिराची संपत्ती ही मेघालय, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या एकत्रीत 1 hours agoDevendra Fadnavis: मी अख्खा महाराष्ट्र सांभाळला, मग ६ जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात? मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. मात्र पालकमंत्रीपदांच्या बाबतीत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपचीच सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडे तुलनेने अधिक जिल्ह्यांचा कार्यभार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे प2 hours agoवजन कसे वाढवाल ?वय आणि उंचीनुसार योग्य वजन नसल्यास काही घरगुती उपायांद्वारे वजन वाढवता येईल. 2 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : भारताचा गोलंदाजीचा निर्णय, भुवनेश्वर इन पंत आऊटIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 2 hours agoटीम इंडियाच्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शनिवारी आपल्या सोशल मीडिया पेजवर 25 सप्टेंबरला लाईव्ह येणार असल्याचे सांगितले होते. यानंतर चाहत्यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून धोनीच्या निवृत्तीचा अंदाज लावला. पण अशी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. एमएस धोनी 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला, तरीही तो अजूनही फ्रँचायझी क्रिकेट खेळत आहे. आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक चेन्नई सुपर किंग्सचा तो कर्णधार आहे.धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याची गणना क्रिकेटविश्वातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून केले जाते. त्याने भारताचे नेतृत्व करताना 2007 मध्ये टी20 विश्वचषक आणि 2011मध्ये वनडे विश्वचषक 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिला आहे. त्याने 90 कसोटी सामने खेळताना 4876 धावा केल्या आहेत. तर 350 वनडे सामन्यात 10773 धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1617 धावा केल्या आहेत.