MS Dhoni आयपीएलमधून घेणार निवृत्ती ? त्या पोस्टमुळे चर्चेला उधाण
क्रीडा

MS Dhoni आयपीएलमधून घेणार निवृत्ती ? त्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

‘मैं पल दो पल का शायर हूँ’ म्हणत दोन वर्षापूर्वी धोनीने निवृत्ती घेतली आहे. दरम्यान आता आयपीएलमधूनदेखील धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. सध्या त्याची एक पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. उद्या लाईव्ह येऊन मोठी घोषणा करणार असल्याचं धोनीने सांगितलं आहे. त्याचा फोटो देखील धोनीने शेअर केला आहे.(MS Dhoni Retirement IG Announcement on Sunday at 2PM)इतर खेळाडूंपेक्षा धोनी सोशल मीडियावर फारसा अॅक्टीव्ह नसतो. मात्र अधून-मधून तो एखादी पोस्ट करतो. यातच त्याने शनिवारी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. जी काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.Recommended Articlesभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना हे नियम पाळातुम्हाला भरपूर भाज्या आणून फ्रीजमध्ये ठेवायची सवय असेल तर काही नियम पाळा. 1 hours agoतळेगाव ढमढेरे येथे मिरवणुकी अभावी बैलपोळा साजरातळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे येथे लंपी आजाराच्या भीतीमुळे सर्व शेतकऱ्यांनी मिरवणूक न काढता व कसल्याही प्रकारचा डमडोल न करता साध्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला. बैल पोळ्यानिमित्त बैलाला पाण्याने अंघोळ घातली, रंग दिला, तसेच महिलांनी पारंपारिक पद्धतीने बैलांची पूजा करून पुरणपोळीचा घास बैलांन1 hours agoNana Patole on Devendra Fadanvis : मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही करत हे आता कळालं? पाटोळेंचा टोमणा३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ६ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्ष चांगलीच खिल्ली उडवत आहेत, यातच नाना पाटोळे यांनी फडवीसांना चांगलाच टोमणा केला.1 hours agoबापरे! पाच राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त तिरुपती बालाजी संस्थानाची संपत्तीTirumala Tirupati Devasthan Trust Property : तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD), या जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्टने अखेर त्यांच्या एकूण मालमत्ता किती याबद्दल माहिती उघड केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंदिराची संपत्ती ही मेघालय, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या एकत्रीत 1 hours agoधोनी या फेसबुकच्या पोस्टमध्ये , “मी 25 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता लाईव्ह (थेट प्रक्षेपण) येणार आहे आणि यावेळी मी एक रोमांचक बातमी शेयर करणार आहे. तुम्ही सगळे उपस्थित असाल अशी आशा आहे.” म्हटले आहे. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष धोनीच्या लाईव्हकडे लागून राहिले आहे.धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी धोनी आयपीएलचे सामने खेळतो. मागच्या आयपीएलवेळी धोनीने निवृत्ती घेण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, धोनीला चेन्नईच्या मैदानावर निवृत्ती घेण्याची इच्छा आहे. तसं त्याने बोलून देखील दाखवलं होतं. अशात त्याची ही पोस्ट पाहता नेमंक धोनी काय बोलणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर तो क्रिकेटविश्वातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो. त्याने भारताचे नेतृत्व करताना 2007 मध्ये टी20 विश्वचषक आणि 2011मध्ये वनडे विश्वचषक जिंकून दिला आहे. तसेच त्याने 2013च्या विजेत्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताचे कर्णधारपद भुषविले होते. त्याने 90 कसोटी सामने खेळताना 4876 धावा केल्या आहेत. तर 350 वनडे सामन्यात 10773 धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1617 धावा केल्या आहेत.