National Cinema Day: तिकीट कमी काय केलं थिएटर तुडूंब! 65 लाख प्रेक्षकांची गर्दी
सिनेमा

National Cinema Day: तिकीट कमी काय केलं थिएटर तुडूंब! 65 लाख प्रेक्षकांची गर्दी

National Cinema Day: राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या निमित्तानं एक मोठा निर्णय घेण्यात आला होता. तो म्हणजे यादिवशी प्रेक्षकांना अवघ्या 75 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार होता. कोणताही चित्रपट त्यांना 75 रुपयांच्या तिकिटामध्ये (bollywood movies) पाहण्याची सोय होती. या अभिनव उपक्रमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. यादिवशी थिटएरमध्ये आलेल्या प्रेक्षकांचा आकडा ऐकून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये या नॅशनल फिल्म डे साजरा करण्यात आला आहे.द मल्टिप्लेक्स असोशिएशन ऑफ इंडिया (एमएआय) कडून एक मोठी आकडेवारी (MAI) समोर आली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नॅशनल फिल्म डेच्या दिवशी देशातील तब्बल 6.5 मिलियन प्रेक्षकांनी थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला आहे. ही मोठी आनंदाची आणि अभिमानाची बाब मानली जात आहे. देशातील एकुण चार हजारांहून अधिक स्क्रिनवर चित्रपट पाहिला गेल्याचे सांगण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या प्रभावामुळे चित्रपटगृहे ओस पडली होती. आता कुठे प्रेक्षक थिएटरमध्ये जात असताना त्यांना नॅशनल फिल्म डेच्या निमित्तानं पुन्हा एकदा वेगळ्या अनुभवाचा आनंद घेता आला आहे. Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : केएल राहुल बाद! भारताला पहिल्याच षटकात पहिला धक्काIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म45 minutes agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.47 minutes agoसचिन पायलट यांच्याऐवजी निकटवर्तीयाला CM बनवण्याचा गेहलोत यांचा आग्रह? ठरावही केला
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी अशोक गेहलोत गटाचे सुमारे 56 आमदार काँग्रेसनेते शांती धारीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. धारीवाल हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. (sachin pilot news in Marathi)55 minutes agoPune : इटलीतील स्पर्धेत आयर्नमॅन किताब मिळाल्याचा अभिमानउंड्री : खवळलेल्या समुद्रातील थंडगार पाण्यात ४ किमी पोहणे्, हेड विंड क्रॉस विंडमध्ये १८० किमी सायकलिंग, आणि गरम व रात्री थंड वातावरणात ४२ किमी रनिंग करीत आयर्नमॅनचा किताब मिळाल्याचा अभिमान वाटत, असे ज्योतिराम चव्हाण यांनी सांगितले.1 hours agoNational Cinema Dayदेशातील पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निव्हल, मिराज, सिटीप्राईड, मुक्ता ए 2, मुव्ही टाईम, वेव, एम टू के. डिलाईट यांच्याशिवाय आणखी काही महत्वाच्या सिनेवितरकांनी थिएटरमध्ये प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले आहे. 65 लाख प्रेक्षकांनी केलेली गर्दी ही मोठी बाब मानावी लागेल. तिकिट दर कमी करणे यामागील हेतू असा की, प्रेक्षकांनी थिएटरमध्ये यावे. चित्रपटाचा आनंद घ्यावा. हा होता. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.National Cinema Dayहेही वाचा: Heart Of Stone: ‘ब्रम्हास्त्र’तून थेट ‘हॉलीवूड’मध्ये, आलियाची चांदी! 23 सप्टेंबर हा नॅशनल फिल्म डे म्हणून साजरा कऱण्यात आला . यादिवशी प्रेक्षकांची सर्वात मोठी गर्दी थिटएरमध्ये दिसून आली. प्रेक्षकांनी दिलेल्या तुफान प्रतिसादाचे सगळीकडे कौतूक होत आहे. प्रेक्षकांनी देखील अशाप्रकारचे वेगवेगळे उपक्रम साजरे केले जावेत असे म्हटले आहे. हेही वाचा: Ira-Nupur Shikhare: आमिरची लेक होणार पुण्याची सून! जावईबापू पुण्याचा ‘जीमकरी’