Land Slide In Nepal : भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये मोठा अपघात झाल्याचे वृत्त आहे. पश्चिम नेपाळच्या अछाम जिल्ह्यात विविध ठिकाणी भूस्खलनामुळे किमान 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 10 नागरिक अद्यापही बेपत्ता असून 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे,अशी माहिती उपमुख्य जिल्हाधिकारी दीपेश रिजाळ यांनी दिली आहे. सध्या घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, गृहमंत्र्यांनी शोध आणि बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.नेपाळमध्ये संततधार पावसाचा फटका बसला असून, त्यामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडून अपघात घडत आहेत. नेपाळमधील दारचुला जिल्ह्यातील बांगबागड परिसरात गेल्या शनिवारी पूर आणि भूस्खलनात किमान दोन जण ठार झाले होते, तर 11 जण बेपत्ता झाले होते. संततधार पावसामुळे लस्कू आणि महाकाली नद्यांना पूर आला असून, ज्यामुळे घरे आणि दोन पूल वाहून गेले. नेपाळमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पूर आणि भूस्खलनाच्या आपत्तींमुळे अनेक बळींची नोंद होत आहे.Recommended ArticlesKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी20 minutes agoविरोधकांची एकजूट! पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान 20 minutes agoIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म24 minutes agoNana Patole on RSS : पटोलेंचा भाजपला टोला, “RSS सुद्धा राहुल गांधींच्या पावलावर.. ” काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रा सुरु आहे यातच नाना पाटोले यांनी अमरावतीत मेळावा घेतला. यावेळी कार्यकत्र्यांना संबोधित करताना त्यांनी भाजपला टोला लगावत म्हंटल कि, राहुल गांधींच्या पदयात्रेचा चमत्कारच म्हणावा लागेल, ज्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा मशिदीत गेले.37 minutes ago
Land Slide In Nepal : भूस्खलनात 13 ठार; 10 बेपत्ता, मदतकार्य सुरू