ISI एजंटची पळून पळून केली हत्या; वाचवण्यासाठी मुलीची छतावरून उडी
ताज्या बातम्या

ISI एजंटची पळून पळून केली हत्या; वाचवण्यासाठी मुलीची छतावरून उडी

काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडू येथे आयएसआय एजंटची पळून पळून हत्या करण्यात आली आहे. लाल मोहम्मद उर्फ मोहम्मद दर्जी असं या ISI एजंटचं नाव असून तो कारने आपल्या घरी आला होता. घरी आल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्याला वाचवण्यासाठी त्यांच्या मुलीने छतावरून उडी मारली पण गोळीबारात मोहम्मद दर्जी याचा मृत्यू झाला आहे. (ISI Agent Murder in Nepal)दरम्यान, हत्या करण्यात आलेला मोहम्मद दर्जी हा पाकिस्तान आणि बांग्लादेशमधून भारतीय चलन भारतात पोहचवत होता. ISIच्या सांगण्यावरून तो हे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर तो डी गँगच्या संपर्कात होता. त काठमांडू येथील कोठाटार येथे राहत होता. १९ सप्टेंबर रोजी तो आपल्या कारने घरी आला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. ते पाहून त्यांच्या मुलीने छतावरून उडी टाकली आणि हल्लेखोरांकडे पळाली पण त्या हल्ल्यात मोहम्मदचा मृत्यू झाला. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. Recommended ArticlesMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज1 hours agoNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु1 hours agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स1 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 1 hours agoहेही वाचा: Supreme Court: हिजाब मुलांना सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील बनवू शकतो पोलिसांच्या माहितीनुसार, ४ जुलै २००७ रोजी काठमांडू मधील एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या हत्येच्या आरोपाखाली लाल मोहम्मद आणि डी कंपनीचा शार्प शूटर मुन्ना खान याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्या दोघांना दहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर लाल मोहम्मद याची आता अज्ञातांकडून हत्या करण्यात आली आहे.काय आहे ISI?इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) ही आंतरराष्ट्रीय हेरगिरी करणारी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आहे. भारतातील अनेक दहशतवादी कारवायांत या संस्थेचा हात होता.