Nokia T10 टॅबलेटची किंमत भारतात लाँचिंगआधीच लीक, जाणून घ्या सर्वकाही
इन्फोटेक

Nokia T10 टॅबलेटची किंमत भारतात लाँचिंगआधीच लीक, जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्लीः Nokia T10 टॅबलेटला लवकरच भारतात लाँच केले जावू शकते. परंतु, लाँचिंग आधीच नोकियाच्या टी १० टॅबलेटची किंमत लीक झाली आहे. HMD Global ने याच वर्षी जुलै मध्ये या टॅबलेटची घोषणा केली होती. नोकियाचा हा कॉम्पॅक्ट डिव्हाइस ८ इंच एचडी डिस्प्ले सोबत येतो. नोकियाच्या या टॅबलेट मध्ये ३ वर्षांपर्यंत अपडेट मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. नोकियाच्या या टॅबलेटमध्ये काय काय आहे खास, सविस्तर जाणून घ्या.

Nokia T10 Tablet Leaked Price
नोकिया टी10 टॅबलेट ची किंमत लीक झाल्याची माहिती Nokia Power User च्या एका रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, भारतात टॅबलेटला ११ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच केले जावू शकते. Amazon Great Indian Festival Sale मध्ये ऑफर पजेवर याच्या किंमतीला लिस्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

Nokia T10 Tablet Specifications

नोकिया टी10 टॅबलेट अँड्रॉयड १२ सोबत येतो. हे अँड्रॉयड इंटरप्राइज रिकमंडेड डिव्हाइस आहे. कंपनीने आश्वासन दिले आहे की, या टॅबलेट मध्ये ३ वर्षांपर्यंत मंथली सिक्योरिटी अपडेट मिळतील. नोकियाच्या टी १० टॅबलेटला पॉवर देण्यासाठी 5100mAh ची बॅटरी दिली आहे. जी 10W चार्जिंग सपोर्ट करते. हे टॅबलेट वाय फाय आणि वाय फाय प्लस 4G LTE अशा दोन्ही व्हेरियंट मध्ये येते.

नोकियाच्या या नवीन टॅबलेट मध्ये Unisoc T606 प्रोसेसर दिले आहे. या टॅबलेटमध्ये ८ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. यात ८ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा दिला आहे. जो ऑटोफोकस आणि फ्लॅश सोबत येतो. या टॅबलेट मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी सोबत येतो. नोकियाचा हा टॅबलेट IPX2-रेटिंग म्हणजेच वॉटर रेजिस्टेंट सोबत येतो. हे टॅबलेट ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज सोबत येते. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेजला ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.