रशिया, युक्रेनमध्ये मोदीचं प्रस्थापित करु शकतात शांतता; मेक्सिकोचा UNमध्ये दावा
ताज्या बातम्या

रशिया, युक्रेनमध्ये मोदीचं प्रस्थापित करु शकतात शांतता; मेक्सिकोचा UNमध्ये दावा

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी आणि या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूनं विशेष समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मेक्सिकोनं संयुक्त राष्ट्रांसमोर मांडला आहे. विशेष म्हणजे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश असणार आहे. या दोन्ही देशांमध्ये कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी मोदीच प्रयत्न करु शकतील असंही मेक्सिकोनं युएनमध्ये म्हटलं आहे. (Only PM Modi can broker peace between Ukraine and Russia Mexico at UN)हेही वाचा: Maharashtra Politics : CM शिंदे दिल्लीला गेले; जाताना लेकाला राज्याचा कारभार देऊन गेले? खरंतर पंतप्रधान मोदींसह ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस आणि युएनचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांचाही या समितीत समावेश करण्यात यावा असंही मेक्सिकोनं म्हटलं आहे. न्यूयॉर्क इथं युक्रेनमधील परिस्थितीबाबत आयोजित युएनच्या सिक्युरिटी काऊन्सिलच्या डिबेटमध्ये मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो लुईस एब्रार्ड कॅसिबोन यांनी हा प्रस्ताव मांडला.Recommended Articlesबापरे! पाच राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त तिरुपती बालाजी संस्थानाची संपत्तीTirumala Tirupati Devasthan Trust Property : तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD), या जगातील सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्टने अखेर त्यांच्या एकूण मालमत्ता किती याबद्दल माहिती उघड केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंदिराची संपत्ती ही मेघालय, मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या एकत्रीत 2 hours agoDevendra Fadnavis: मी अख्खा महाराष्ट्र सांभाळला, मग ६ जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात? मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. मात्र पालकमंत्रीपदांच्या बाबतीत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये भाजपचीच सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडे तुलनेने अधिक जिल्ह्यांचा कार्यभार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे प2 hours agoवजन कसे वाढवाल ?वय आणि उंचीनुसार योग्य वजन नसल्यास काही घरगुती उपायांद्वारे वजन वाढवता येईल. 2 hours agoIND vs AUS 3rd T20I Live : भारताचा गोलंदाजीचा निर्णय, भुवनेश्वर इन पंत आऊटIND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 – 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा 2 hours agoहेही वाचा: RSS : सरसंघचालक मोहन भागवतांना ‘राष्ट्रपिता’ म्हणणारे उमर अहमद इलियासी कोण आहेत?दरम्यान, उझबेकिस्तानच्या समरकंद इथं शांघाई सहकार संघटनेची (SCO) 22वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत PM मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांची भेट झाली होती. यावेळी “आजचं युग हे युद्धाचं नाही,” असं मोदींनी पुतिन यांना सांगितलं होतं. मोदींच्या या विधानाचं स्वागत अमेरिकेसह पश्चिमेकडील देशांसह फ्रान्स आणि युकेनंही केलं होतं.