पडझडीतून क्रिप्टो सारवले; जाणून घ्या बिटकॉइनसह इतर चलनांची किंमत
अर्थविश्व

पडझडीतून क्रिप्टो सारवले; जाणून घ्या बिटकॉइनसह इतर चलनांची किंमत

मुंबई : क्रिप्टो करन्सींवरील मंदीच मळभ दूर झाले आहे. आज मंगळवारी बिटकॉइनसह प्रमुख आभासी चलनांच्या किंमतीत वाढ झाली. आज बिटकॉइनचा भाव २१ हजार डॉलरसमीप पोहोचला.

‘कॉइनमार्केटकॅप’नुसार आज मंगळवारी बिटकॉइनचा भाव १.४४ टक्क्यांनी वाढला. एका बिटकॉइनचा भाव २०,९७४.८५ डॉलरपर्यंत वाढला. गेल्या आठवड्यात बिटकॉइनने १८ महिन्यांतीन नीचांकी स्तर गाठला होता. महिनाभरात बिटकॉइन गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये बिटकॉइनने ६९,००० डॉलरचा विक्रमी स्तर गाठला होता. जवळपास ७० टक्के मूल्य नष्ट झाले आहे.

इथेरियमच्या किमतीत मात्र किंचित घसरण झाली आहे. आज इथेरियमचा भाव ०.१० टक्के घसरला. एक इथेरियमचा भाव १,१४०.८८ डॉलर इतका खाली आला. मागील आठवडाभरात त्यात ३ टक्के घसरण झाली. सोलाना कॉइनच्या किंमतीत देखील घसरण झाली. एका सोलाना कॉइनचा भाव ३७.३९ डॉलर इतका वाढला. आठवडाभरात त्यात २९.५७ टक्के वाढली.

अल्व्हान्चे कॉइनचा भाव १७.५५ डॉलर असून त्यात ०.८३ टक्के घसरण झाली. शिबू या डिजिटल कॉइनचा भाव ०.०००००९० डॉलर आहे. त्यात १२.९२ टक्के वाढ झाली. पोलकॅडॉटचा भाव ८ डॉलर इतका असून त्यात ०.०४ टक्के वाढ झाली.

डोजेकॉइनचा भाव ०.०६ डॉलर आहे. त्यात ५.०८ टक्के वाढ झाली. तिथेर कॉइनचा भाव ०.९९ डॉलर आहे.बीएनबीचा भाव २१९.४७ डॉलर इतका असून त्यात २.४२ टक्के वाढ झाली. एक्सआरपी कॉइनचा भाव ०.३२ डॉलर इतका आहे. कार्डानोचा कॉइनचा भाव ०.५० डॉलर इतका आहे.

गेल्या महिनाभरात सर्वच आभासी चलनांच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी क्रिप्टो करन्सीमधून काढता पाय घेतल्याने बिटकॉइनसह प्रमुख चलनांच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती.