मुलांचा आयक्यू लेव्हल वाढवण्यासाठी पालकांनी ‘या’ गोष्टी खास लक्षात ठेवाव्या
लाइफस्टाइल

मुलांचा आयक्यू लेव्हल वाढवण्यासाठी पालकांनी ‘या’ गोष्टी खास लक्षात ठेवाव्या

आयक्यू हे मूलाला इतर मुलांपेक्षा वेगळे बनवते.आयक्यू म्हणजे इंटेलिजेंट कोटेंट. लहानपणापासूनच काही गोष्टींची काळजी घेतल्यास मुलांची आयक्यू लेव्हल वाढवता येऊ शकते, असे अनेक संशोधनांमध्ये आढळून आले आहे.मुलांना प्रेम आणि आदर द्या. त्यांच्यासमोर कधीही अपशब्द वापरू नका किंवा त्यांना मारहाण करू नका.
मुलांना नैसर्गिक गोष्टी आणि नियमांबद्दल शिकवा आणि त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात अधिकाधिक वेळ घालवू द्याजेव्हा मूल प्रश्न विचारू लागते, तेव्हा प्रत्येक प्रश्नाची अचूक आणि शास्त्रीय उत्तरे द्या.भूत, प्राणी, गूढ व्यक्ती किंवा इतर कोणत्याही गोष्टीने मुलाला कधीही घाबरवू नका.मुलांशी नेहमी त्यांच्या डोळ्यात बघून बोला आणि प्रयत्न करा की जेव्हा ते तुमच्याशी बोलतात तेव्हा ते तुमच्या डोळ्यातही पाहत असावे.मुलाच्या मेंदूच्या विकासासाठी ही एक उत्तम क्रिया असू शकते. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी खेळणेही आवश्यक आहे.तुम्ही तुमच्या मुलाला गिटार, सितार, हार्मोनियम असे कोणतेही वाद्य वाजवायला शिकवू शकता.कधी-कधी मुले खेळता खेळता अनेक गोष्टी शिकतात. मुलाला खेळता खेळता पाढे किंवा बेरीज- वजाबाकीचे प्रश्न सोडवायला लावा. दररोज 10 ते 15 मिनिटे असे केल्याने मुलाची आयक्यू पातळी लक्षणीय वाढेल.दीर्घ श्वास घेणे हे ब्रेन हॅक पैकी एक आहे. दीर्घ श्वास घेतल्याने चांगले विचार मनात निर्माण होतात.मुलांचा बुद्ध्यांक वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत बुद्धिबळ सारखे खेळ खेळा. अशा खेळांमुळे मुलांचा मानसिक विकास होण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *