Perfect Bra Tips: प्रत्येक मुलीला ब्रा विषयी ‘या’ गोष्टी माहिती हव्याचं
लाइफस्टाइल

Perfect Bra Tips: प्रत्येक मुलीला ब्रा विषयी ‘या’ गोष्टी माहिती हव्याचं

ब्राविषयीच्या काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ब्रा फिटिंगल अगदी योग्य असावी. तुम्हाला तुमच्या ब्राची योग्य साईज कायम माहिती पाहिजे. यासाठी तुम्ही दुकानातील स्टाफची मदत घेऊ शकता. किंवा घरी मेजरमेंट टेप असेल तर त्यांने तुमच्या छातीचा भाग मोजून घ्यावा. त्यानंतर तुम्ही योग्य आकाराची ब्रा निवडावी. जर तुमची साईज 32 असेल तर आता कप साईजही तेवढीच महत्त्वाची आहे. ती लक्षात येण्यासाठी तुम्ही ब्रा ट्रायल रुममध्ये घालून बघावी. आणि मग 32A, 32B, 32C, 32D यातून आपली परफेक्ट साईज समजून घ्यावी. ब्रा घातल्यावर आपल्याला श्वास घ्यायला अडचण होत नाही ना, हे निट तपासावे. आपल्या कुठल्या अंग त्यातून बाहेर येत नाही हे योग्य प्रकारे बघावे.उत्तम आरोग्यासाठी परफेक्ट ब्रा घालणे महत्त्वाचे असते. तुमच्या आरोग्य आणि स्तनांसाठी ब्रा ही कायम परफेक्ट असावी. ब्रासंबंधित एक नियम हा देखील आहे रात्री झोपताना ब्रा काढून झोपावे. ब्रा खरेदीसाठी खास वेळ काढावा. ब्रा खरेदी करण्यासाठी जाताना खास वेळ काढून जायला हवे. कारण जी ब्रा तुम्ही घेत आहात ती योग्य आहे ते तपासून पाहण्यासाठी तुमचाकडे वेळ असणे गरजेचे असते.
अगदी आवडलेली प्रत्येक ब्रा घालून बघा, की योग्य आहे का, तुम्हाला ती कम्फर्टेबल आहेत हे पाहायला पाहिजे. वर्षातून दोन वेळा तरी ही ब्राची खरेदी केली पाहिजे. महिलांचं वजन कमी जास्त होत असतं अशावेळी आपल्या स्तनाचा आकारही बदलतो. मग योग्य आकाराची ब्रा घेणं गरजेचं असतं.डेलिकेट ब्राची खास काळजी घेण्याची गरज असते. या ब्रा खास रॅप करुन ठेवा. तसंच ती फोल्ड करुन ठेवू नये. चुकूनही मशिनमध्ये धुऊ नका , कारण अशाने त्या खराब होतात. जर मशिनमध्ये धुवायची असेल तर लॉजरी बॅगचा वापर करा. आजकाल नवीन वॉशिंगमध्ये लॉजरी असा मोडही असतो. शक्य असेल तर ब्रा हाताने धुवा याने ब्रा खराब होत नाही.ड्रायरमध्ये तुमची ब्रा सुकवू नका आणि उन्हात सुद्धा सुकवू नका. ब्रा ही कायम सावलीमध्ये सुकवावी.जर ब्राचा इलास्टिक सैल झाला असेल तर अशा ब्रा वापरु नका. आणि तुमचं वजन वाढलं असेल किंवा कमी झालं असेल ज्यामुळे ब्राचा साइज बदलला असेल तर चुकीची साईज घालू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *