Roger Federer : अखेरचा सलाम, फेडररच्या शेवटच्या सामन्यानंतर नदालला देखील अनावर झाले अश्रू
क्रीडा

Roger Federer : अखेरचा सलाम, फेडररच्या शेवटच्या सामन्यानंतर नदालला देखील अनावर झाले अश्रू

Roger Federer : जगातील महान टेनिसपटू रॉजर फेडररने शुक्रवारी आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. लेव्हर चषक 2022 टेनिस स्पर्धेत फेडरर अखेरचा सामना खेळला. या लेव्हर चषक सामन्यात त्याने राफेल नदालसोबत जोडी केली.मात्र, दोन्ही दिग्गजांना हा सामना जिंकता आला नाही. अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉक या जोडीचा 4-6, 7-6(2), 11-9 असा पराभव केला. यासह फेडररने ओल्या डोळ्यांनी टेनिसला अलविदा केला. यादरम्यान नोव्हाक जोकोविच आणि राफेल नदालही आपले अश्रू आवरता आले नाहीत.Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : स्मिथही पॅव्हेलियनमध्ये; ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावलीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म40 minutes agoMaharashtra : शेवटी, जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली यादी राज्यात शिंदे गट आणि फडणवीसांचं सरकार सत्तेत येऊन जवळपास ३ महिने होत आले. तरी, अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही. त्यात पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबलीत. यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. मात्र अखेर नवीन पालकमंत्र्यांची ज45 minutes agoNashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रु48 minutes agoEknath Shinde Group MLA: 50 खोके एकदम ओके म्हणत, संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला
अमरावती -एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जाताना दिसत आहे. मुळ शिवसेना कोणाची हा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र ग्राउंड लेव्हलला शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच शिंदे गटाचे चर्चेतील आमदार स54 minutes agoरॉजर फेडरर हा सध्याच्या युगातला टेनिसचा सम्राट म्हणून ओळखला जातो. फेडरर हा आपल्या शैलीदार टेनिस फटक्यांसाठी प्रसिद्ध होता. तो आपल्या सहजतेने मारलेल्या बॅकहँड फटक्यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना अवाक करायचा. फेडररने आपल्या व्यावसायिक टेनिस कारकिर्दीत 20 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. सहा ऑस्ट्रेलियन ओपन, एक फ्रेंच ओपन टायटल, आठ विम्बल्डन तर पाच युएस ओपन ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत. त्याने 2018 ला आपले शेवटचे ग्रँडस्लॅम (ऑस्ट्रेलियन ओपन) जिंकले होते.विशेष म्हणजे रॉजर फेडरर 20 ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला पुरूष टेनिसपटू ठरला होता. तो जवळपास 310 आठवडे एटीपीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर राहिला होता. तो तब्बल 237 आठवडे सलग रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. सर्वाधिक आठवडे रँकिंगमध्ये टॉपवर राहण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावर आहे. तसेच सलग पाच वर्षे युएस ओपन (2004 ते 2008) ग्रँडस्लॅम जिंकणारा तो एकमेव टेनिसपटू आहे.