दर्जेदार स्मार्टफोन लॉन्च करत बाजारात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या रिअलमीने काही दिवसांपूर्वी रिअलमी जीटी नियो 3 हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. त्यात स्टेनलेस स्टील व्हेपर कूलिंग सिस्टम आणि 80Wच्या सुपरफास्ट चार्जिंग सुविधेसह नवाकोरा रिअलमी जीटी नियो 3T स्मार्टफोन बाजारात आला आहे.रिअलमीने जीटी सीरिजमध्ये आतापर्यंत अनेक स्मार्टफोन सादर केले. त्यात रिअलमी जीटी मास्टर एडिशन, रिअलमी जीटी 5G, रिअलमी जीटी नियो 2, रिअलमी जीटी 2, रिअलमी जीटी 2 प्रो, रिअलमी जीटी नियो 3 हे स्मार्टफोन लॉन्च झाला. वरील सर्व स्मार्टफोन मिड-प्रीमियम बजेट सीरिजमध्ये होते. त्यातच आता रिअलमीने खास नव्या फीचरसह रिअलमी जीटी नियो 3T हा नवाकोरा स्मार्टफोन लॉन्च केला.रिअलमी जीटी निओ 3T या स्मार्टफोनमध्ये वेगवान परफॉर्मन्ससाठी Qualcomm® Snapdragon™ 870 5G प्रोसेसर देण्यात आले आहे. त्यामुळे गेमिंगसाठीही हा स्मार्टफोन उत्तम पर्याय ठरतो आहे. विशेष म्हणजे गेमिंगमुळे स्मार्टफोनमध्ये ओव्हरहिटिंगचा प्रश्न उद्भवू नये म्हणून खास स्टेनलेस स्टील व्हेपर कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. तसेच 80W सुपरडार्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी दिल्याने बराच वेळ गेमिंगचा विनासायास अनुभव घेता येतो. ड्युअल सेल सीरिजमुळे ही बॅटरी अवघ्या 12 मिनिटांमध्ये 50 टक्के चार्ज होते.या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला असून, त्यात F/1.79 अॅपेरचर दिल्याने कमी प्रकाशव्यवस्थेतही चांगले फोटो काढता येतात. 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही तुलनेने चांगला आहे. तसेच हा स्मार्टफोन 6 GB आणि 8 GB अशा दोन रॅम व्हेरियंटमध्ये उपलब्ध असला, तरी अतिरिक्त 5GB डायनामिक रॅम एक्सटर्नल स्टोअरेजमधून वापरता येते. हा स्मार्टफोन तब्बल 194 ग्रॅम असल्याने तो हाताळायला थोडा जड वाटतो. वजन आणखी कमी करता आले असते, तर इन-हॅण्ड फील उत्तम आला असता.डिस्प्ले : 6.62” E4 AMOLED 120Hz Displayप्रोसेसर : Qualcomm® Snapdragon™ 870 5G Processorरॅम : 6 GB, 8 GBस्टोरेज : 128 GB, 256 GBरिअर कॅमेरा : 64 MP + 8 MP + 2 MPफ्रंट कॅमेरा : 16 MPबॅटरी : 5000 mAh (80W)ऑपरेटिंग सिस्टिम : अॅण्ड्रॉईड 12रंग : डॅश व्हाइट, ड्रिफ्टिंग येलो आणि शेड ब्लॅककिंमत – 6GB+128GB – 29,999, 8GB+128GB – 31,999, 8GB+256GB – 33,999Recommended ArticlesIND vs AUS 3rd T20I Live : अक्षर पटेलचा भेदक मारा; मॅथ्यू वेड देखील माघारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म8 minutes ago…तर त्यांना दाखवलं असतं; हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रियाAttack on MLA Santosh Bangar Convoy : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सुरु झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीये. शिवसेना कोणाची यावरून देखील अद्याप कोर्टात वाद सुरू आहे. यादरम्यान थोडं उशीराने शिंदे ग13 minutes agoVIDEO| Axar Patel : अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला ‘लकी’ Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत15 minutes agoहिवाळ्यात ‘या’ फळांच्या सेवनाने राहाल निरोगीसंत्र खाण्याची दोन महत्वाची कारणं म्हणजे यामध्ये व्हिटामीन सी आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं. संत्र्यामुळे त्वचा देखील तजेल राहण्यास मदत होते.17 minutes ago
टेक्नोहंट : रिअलमीचा ‘कूल’ अंदाज